तळोजे एम.आय.डी.सी. मधील व्हिस्टा कंपनीकडून जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला तीन संगणक संचांची देणगी* *नजीकच्या काळात रुपये पाच लाखांची अत्यावश्यक औषधे CSR फंडातून देण्याची घोषणा..... चंद्रशेखर सोमण यांची आश्वासन पूर्ती...*




तळोजे एम.आय.डी.सी. मधील व्हिस्टा कंपनीकडून जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला तीन संगणक संचांची देणगी*

 *नजीकच्या काळात रुपये पाच लाखांची अत्यावश्यक औषधे CSR फंडातून देण्याची घोषणा..... चंद्रशेखर सोमण यांची आश्वासन पूर्ती...*

 गुरुवार दिनांक ५ऑक्टोबर २०२३ रोजी व्हिस्टा फूड्स या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीकडून जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला देणगी दाखल तीन कम्प्युटर संच सुपुर्द करण्यात आले असून लगेच कार्यान्वित सुद्धा करण्यात आले.

 याप्रसंगी शिवसेना पनवेलचे स्थानिक नेते व कंपनीचे व्यवस्थापन सल्लागार चंद्रशेखर सोमण, रुग्णालयातर्फे अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ, डॉ. सकपाळ डॉ. जठार तसेच कंपनीचे प्लांट हेड प्रवीण ठाकूर, एच. आर. डिपार्टमेंटच्या इंद्रायणी आगलावे, प्रथमेश पाटील, आय टी डिपार्टमेंटचे अजित मिश्रा, रुग्णालय कर्मचारी, शिवसेना महानगर प्रमुख ॲड. प्रथमेश सोमण, पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला ॲड. प्रथमेश सोमण यांनी प्रास्तविक करून चंद्रशेखर सोमण व ग्रामीण रुग्णालयाची धडपड अधोरेखित केली तसेच यापूर्वीही डिसेंबर २०१९ मध्ये व्हीस्टा कंपनीकडून रुपये पाच लाखांची औषधे ही एस आर फंडातून दिल्याचे विशेष करून नमूद केले. तसेच चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने टिळक रोड मित्र मंडळातील सदस्यांच्या आर्थिक सहकार्यातून रुपये दोन लाखांच्या शवपेटिका फेब्रुवारी २०२० मध्ये कार्यान्वित केल्याचा आवर्जून उल्लेख केला. सप्टेंबर महिन्यात रुग्णालयाला भेट दिल्यानंतर काही प्रश्न तातडीने मार्गी लावल्यावर आज तीन कम्प्युटरची देणगी व्हिस्टा कंपनीतर्फे देत असून लवकरच सुमारे पाच लाखाची अत्यावश्यक औषधे सुद्धा कंपनी सीएसआर फंडातून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन सोमण यांनी दिले. त्याचप्रमाणे पनवेलचे हे रुग्णालय टिकवण्याची आणि जगवण्याची जबाबदारी आपल्या सर्व नागरिकांची आणि सामाजिक संस्थांची आहे असे आवाहन केले. रुग्णालयातर्फे डॉ. सकपाळ यांनीही चंद्रशेखर सोमण यांचेविषयी व कंपनी विषयी कृतज्ञता व्यक्त करून कोरोना काळातील सोमण कुटुंबीयांच्या सक्रीय सहभागाचा आवर्जून उल्लेख केला.  

याप्रसंगी विशेष करून उपस्थित असलेले पनवेल मधील सुप्रसिद्ध पटवर्धन हॉस्पिटलचे प्रशासकीय प्रमुख श्री. लघाटे यांनी सुद्धा चंद्रशेखर सोमण आणि व्हीस्टा कंपनीने २०१५ पासून सातत्यपूर्ण आर्थिक मदत सुरू ठेवल्याचा आवर्जून उल्लेख करून कंपनीचा गौरव करून त्यांच्या पैशातून आज अनेक गरजू डायलिसिस रुग्णांना आधार मिळत असल्याचे नमूद केले. अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ यांनी अत्यावश्यक औषधांची यादी व नवीन शवपेटीकांचे लेखी विनंती पत्र व्हीस्टा कंपनी व चंद्रशेखर सोमण यांना दिले.

 चंद्रशेखर सोमण व उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलमधील डायलिसीस केंद्र व आय.सी.यू. केंद्राला विशेष करून भेट देऊन तिथे उपचाराधीन रुग्णांशी संपर्क साधला. 

 सध्या महाराष्ट्रात सरकारी रुग्णालयात सुरु असलेल्या दुर्दैवी प्रकारच्या पार्श्वभूमीवर सगळे पनवेलकर मिळून पनवेल ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्वसामान्यांवरती योग्य औषधोपचार मिळतील असा आशावाद सोमण यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना पनवेलचे महानगर प्रमुख ॲड. प्रथमेश सोमण, उपमहा नगर प्रमुख महेश सावंत, शहर संघटक अभिजीत साखरे, विभागप्रमुख आशिष पनवेलकर, विभागप्रमुख अविनाश साफल्य, शाखाप्रमुख किरण पवार, यांच्यासह सर्व पदाधिकारी, रुग्णालयातील कर्मचारी, उपस्थित रुग्ण, पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर