कोल्ही गाव हे स्वतंत्र्य गाव म्हणून जाहीर करण्याची पारगाव ग्रामपंचायतीची मागणी





कोल्ही गाव हे स्वतंत्र्य गाव म्हणून जाहीर करण्याची पारगाव ग्रामपंचायतीची मागणी

पनवेल (संजय कदम): कोल्ही गाव हे स्वतंत्र्य गाव म्हणून जाहीर करण्याची मागणी पारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे तसेच गट विकास अधिकाऱ्यांकडे दिले आहे. 

      पारगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत कोल्ही हे गाव अंतरराष्ट्रीय विमानतळ सोडत असल्यामुळे त्याचे पुर्नवसन झाले आहे. सदरचे पुर्नवसन वडघर हद्दीतीन झाले असल्याने सदरचे कोल्ही गाव हे स्वतंत्र्य गाव म्हणून घोषित करावे व त्याची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात यावी अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आणि पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळाराम नाईक यांच्यासह कोल्ही गावातील पंच कमिटी अमृत भोईर, नारायण भोईर, संतोष राजेंद्र भोईर, प्रवीण भोईर, सुधीर नाईक, चंद्रकांत भोईर, संतोष शंकर नाईक, साहिल नाईक, हितेश नाईक, राजेश भोईर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना सुद्धा या मागणीचे निवेदन सुद्धा दिले होते. त्यांनी सुद्धा याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर