पनवेल महानगरपालिकेचे वृक्षप्रेम बेगडी, पोलिसांचा गुन्हे दाखल करण्यास विलंब आठ दिवसात गुन्हे दाखल न झाल्यास पालिका व पोलिस प्रशासना विरोधात आंदोलन करणार - डॉ.मुनीर तांबोळी
पनवेल महानगरपालिकेचे वृक्षप्रेम बेगडी, पोलिसांचा गुन्हे दाखल करण्यास विलंब
आठ दिवसात गुन्हे दाखल न झाल्यास पालिका व पोलिस प्रशासना विरोधात आंदोलन करणार - डॉ.मुनीर तांबोळी
पनवेल / प्रतिनिधी
नवीन पनवेल येथील सेक्टर २ येथील नवभारत सोसायटी आवारातील ३७ झाडांची तर सेक्टर ३ येथील कर्णा सोसायटीने १ झाड, पनवेल येथील महापालिका समोरील दर्ग्या समोरील एक झाड, खारघर टोल नाका येथील अनेक वृक्ष
कत्तल करण्यात आली होती. याबाबत महापालिकेने खांदेश्वर,पनवेल, खारघर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिले होते. परंतु अजून एका ही पोलिस ठाण्याने एक ही गुन्हा अजूनही दाखल केलेला नाही. त्यामुळे असे वृक्षतोडीचे प्रकार सर्रास घडत आहेत. ही वृक्ष कत्तल व छाटणी करण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. याबाबत मानवी हक्क संरक्षण फेडरेशचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ श्रेयस ठाकूर यांनी महापालिका, मुखमंत्री यांना
तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने त्या ठिकाणी जावून पंचनामा केला. परंतु पुढील कोणतीच कारवाई होत नसल्याने महापालिकेचे पंचनामे कागदावरच राहत आहेत. पंचनामे केवळ दिखाव्यापुरते महापालिका करतात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सेक्टर २ नवीन पनवेल (पूर्व) नवभारत, कर्णा सोसायटी, खारघर टोल नाका जवळ, पनवेल मधील पिर करम अली शाह दर्गा ट्रस्ट विरुध्द योग्य ती चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात यावा असे लेखी पत्र महापालिकेतर्फे खांदेश्वर व पनवेल पोलीस ठाण्याला देण्यात आले होते परंतु पनवेल, खांदेश्वर, खारघर पोलिस ठाण्याने अजून पर्यंत कोणतीच कारवाई केलेली नाही. या जागेचा पंचनामा सुध्दा करण्यात आला होता. परंतु महापालिकेचे हे पंचनामे कागदावरच राहिले आहेत.
महापालिकेने याबाबत खांदेश्वर व पनवेल पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. परंतु महापालिका याबाबत कोणताच पाठपुरावा करत नसल्याने हा गुन्हा दाखल होत नसल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे महानगरपालिकेचे वृक्षप्रेम बेगडी असल्याचे दिसून येत आहेत.तर पोलिसांचा विना परवानगी वृक्ष तोड करणाऱ्यांना पाठिंबा तर नाही ना अशी चर्चा नागरिकांना मध्ये आहे.
मानवी हक्क संरक्षण फेडरेशन तर्फे महापालिका आणि पोलिस आयुक्तांना विना परवानगी वृक्ष तोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास होत असलेल्या विलंबाबाबत पत्र देण्यात येणार असून जर येत्या ८ दिवसात गुन्हे दाखल नाही झाले तर महापालिका आणि पोलिस प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ.मुनीर तांबोळी यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment