पोद्दार जम्बो किडस शाळेत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी



पोद्दार जम्बो किडस शाळेत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी 

पनवेल, द(वार्ताहर) ः पनवेलमधील पोदार जम्बो किडस शाळेत लहान मुलांच्या सहभागाने महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनातील अनेक घटनांना उजाळा देत त्यांचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली.

पनवेल मध्ये पोदार जंबो किड्सची सुरुवात फेब्रुवारी 2023 मध्ये झाली.आज दिनांक २ ऑक्टोबार रोजी देशाचे राष्ट्रपिता म्हणून ज्यांची ओळख आहे ते महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांनी जयंती देशभरात साजरी होत असते. लहान लहान बालकांना, विद्यार्थ्यांना या दोन्ही महान व्यक्तींची माहिती व्हावी या उद्देशाने पोदार जम्बो किड्सच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेमध्ये बापूंचे जीवन आणि शास्त्री यांचे जीवन उलगडण्याचा प्रयत्न करणे हा उपक्रमाचा भाग होता. यामध्ये गांधींनी काढलेली दांडी यात्रा, , मीठाचा सत्याग्रह , बापूंची वाटिका, कुटी, चरखा बनविणे, गांधीजींच्या पादुका तसेच त्यांच्या जीवनासंबंधी चित्र हा या उपक्रमाचा भाग होता. तर शास्त्री यांची बीज उगवण, अडथळ्यांची शर्यत , जय जवान जय किसान चा दिलेला नारा , वाळू चित्र कला, गांधीजींचे तीन माकडे ज्यांनी चांगले पहा, चांगले ऐका , चांगले बोला याची दिलेली शिकवण याची माहिती देण्यात आली. शास्त्री यांच्या जीवन संबंधित देखील चित्र यावेळी रेखाटण्यात आली होती . या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी हिरीरीने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे हे देखील उपस्थित होते. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या संचालिका स्वप्ना मोहिते यांच्यासह शिक्षक तनिषा चेतवानी, कानन विठ्ठलानी, चांदनी मिराणी, सबा कच्छी, प्राजक्ता घाग आणि त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले. 

फोटो ः पोद्दार जम्बो किडस शाळेत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर