सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी हनुमंत अहिरे यांची पदोन्नती




सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी हनुमंत अहिरे यांची पदोन्नती

रायगड मत 

पनवेल (संजय कदम): पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असणारे हनुमंत घनश्याम अहिरे यांची नुकतीच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर करण्यात आल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ चे उपायुक्त पंकज डहाणे यांनी करंजाडे पोलीस चौकीच्या नूतनीकरण व उदघाटन प्रसंगी केले. 

      हनुमंत अहिरे यांनी आत्ता पर्यंत पोलीस खात्यात केलेल्या नोकरीमध्ये विविध क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली आहे. त्याच प्रमाणे सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले आहेत. दरम्यान महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना बढती मिळून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांचे विशेष अभिनंदन पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ चे उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक पोलीस निरीक्षक कामत, सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात, पोलीस उपनिरीक्षक दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक चौगुले आदींनी केले आहे. 

फोटो: उपायुक्त पंकज डहाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी हनुमंत अहिरे यांचे अभिनंदन करताना

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर