जयेश शितकर थाळी फेकमध्ये प्रथम क्रमांक*
जयेश शितकर थाळी फेकमध्ये प्रथम क्रमांक*
म्हसळा-
नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी क्रिडा स्पर्धा या स्पर्धेत म्हसळा तालुक्यातील मॉडेल स्कूल रा. जि. प. आदर्श शाळा खरसई मराठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी सांघिक खेळ चार प्रकारात आणि वैयक्तिक खेळ बारा प्रकारात तालुका स्तरावर 14 वर्षांखालील मुले, मुली सहभागी झाले होते. यामध्ये मैदानी खेळ थाळी फेक प्रकारात कुमार जयेश उत्तम शितकर यांने 14 वर्षांखालील तीन राऊंड मध्ये थाळी फेक केली असता पहिला राऊंड 20:60 दुसरा राऊंड 17:90 तिसरा राऊंड 18:90 सरासरी मध्ये जयेश शितकर थाळी फेक मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल त्याचे आई, वडील आनंदित असून शाळा व्यवस्थापन समितीने कौतुक केले आहे.
विशेष म्हणजे शाळेचे क्रीडा शिक्षक श्री जयसिंग बेटकर सर यांनी प्रामुख्याने लक्ष वेधून विद्यार्थ्यांचा वेळोवेळी सराव आणि मार्गदर्शन, अचुक नियोजन या सर्व बाबींमुळे विद्यार्थी तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर झेपावताना दिसत आहेत.जिल्हा स्तरावरील २९ सप्टेंबर २०२३ रोजी रसायनी ता. खालापूर येथे मैदानी स्पर्धा होणार आहेत तेंव्हा म्हसळा तालुक्याचे नेतृत्व थाळी फेक मध्ये १४ वर्षांखालील जयेश शितकर नेतृत्व करणार आहे.
Comments
Post a Comment