मालगाडीचे घसरलेले डबे पूर्वपदावर करण्यासाठी गेली २४ तास रेल्वे प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु; पोलिसांसह विविध सामाजिक संस्थांचा प्रवाशांना मदतीचा हात




मालगाडीचे घसरलेले डबे पूर्वपदावर करण्यासाठी गेली २४ तास रेल्वे प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु; पोलिसांसह विविध सामाजिक संस्थांचा प्रवाशांना मदतीचा हात 

पनवेल ( संजय कदम ) : पनवेल रेल्वे स्थानक परिसरात जे एस डब्ल्यू मधून स्टील कोर रोल घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे काल पाच ते सहा डबे रुळावरून घसरले होते . यामुळे कोकण रेल्वे वरील पनवेल स्थानकातून होणारी वाहतूक जवळपास थांबली होती . तसेच लांब पल्ल्याच्या गाडयांना सुद्धा खोळंबा झाला होता . त्यानंतर मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाची फौज या ठिकाणी दाखल झाली व गेले २४ तास त्यांनी युद्धपातळीवर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत . परंतु त्यामुळे पनवेल स्थानक व परिसरात लांब पाल्यांच्या गाडयांना थांबविण्यात आल्याने रेल्वे प्रवासाचे चांगलेच हाल झाले होते . यावेळी रेल्वे प्रशासनासह पनवेल शहर पोलीस ,रेल्वे पोलीस व विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेऊन प्रवाशांच्या अल्पोपहाराची सोय केली होती .    

                  जे एस डब्ल्यू मधून स्टील कोर रोल घेऊन जाणाऱ्या मालगाडीला पनवेल रेल्वे स्थानक परिसरात काल दुपारी अपघात झाला. पाच ते सहा डबे रुळावरून घसरले. सदर मालगाडी मध्ये अवजड स्वरूपाची लोखंडी पट्ट्यांची बंडले असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोकण रेल्वे वरील पनवेल स्थानकातून होणारी वाहतूक जवळपास थांबविण्यात आली होती. परंतु पनवेल रेल्वे स्टेशन या ठिकाणी मालगाडी ट्रॅक वरून घसरल्याने सदर मार्गावरील सर्व ट्रेन कित्येक तास थांबवण्यात आल्या होत्या त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती .सदर बाब नविन पनवेल गुरुद्वारा ,खारघर गुरुद्वारा व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार याना कळताच त्यांनी प्रवाशांना नाष्टा- पाणी वाटप केले. दरम्यान रुळावरून घसरलेल्या ५ व्यागण बाहेर काढण्यात आता पर्यंत यश आले आहे. तसेच तुटलेले ट्रॅक बदलण्याचे काम सुद्धा वेगाने सुरू आहे. त्याच प्रमाणे रोह्या कडे जाणारी एक लेन काल रात्री उशिरा सुरू केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे . असे असले तरी या अपघातानंतर मेल , एक्स्प्रेस रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे . त्यामुळे अनेक गाड्या या ठाणे ,पुणे येथून दुसऱ्या मार्गिकेकडे वळवण्यात आल्या आहेत . तर काही लांब पल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत तर काही रद्द करण्यात आल्या आहेत .

फोटो - रेल्वे प्रवासाना मदतीचा हात


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर