खड्ड्यांना हार घालून मा.नगरसेवक रवींद्र भगत यांनी केले कळंबोली वसाहतीमध्ये अनोखे आंदोलन



खड्ड्यांना हार घालून मा.नगरसेवक रवींद्र भगत यांनी केले कळंबोली वसाहतीमध्ये अनोखे आंदोलन

पनवेल,  ः कळंबोली वसाहतीमधील विविध भागात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात तेथील स्थानिक मा.नगरसेवक रवींद्र भगत व त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून रस्त्यांना हार घालून अनोखेे आंदोलन करून पनवेल महानगरपालिकेचा निषेध केला.

कळंबोली वसाहतीमधील अनेक रस्त्यांना ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत स्थानिक मा.नगरसेेवक रवींद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिकेला वेळोवेळी स्मरण पत्र देवून खड्डे बुजविण्यासंदर्भात मागणी केली होती. परंतु या मागणीला महानगरपालिकेने अजूनही दुर्लक्षितच ठेवले आहे, असा आरोप रवींद्र भगत यांनी केला आहे. नुकतीच कळंबोली वसाहतीसाठी महापालिकेने 300 कोटींच्या कामांना मंजूरी दिली आहे. याचे श्रेय भाजपा घेत असेल तर रस्त्यावरील खड्ड्यांचे श्रेय देखील भाजपनेच घ्यावे असे सुद्धा रवींद्र भगत यांचे म्हणणे आहे. यावेळी त्यांच्या समवेत मा.नगरसेवक गोपाळ भगत व इतर पदाधिकारी, महिला आघाडी यावेेळी उपस्थित होत्या.

फोटो ः रस्त्यांना घातलेले हार

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर