गुरूकूल आरोग्य योगपीठ खरसईचे १८ खेळाडू योगासने खेळात विभाग स्तरावर
गुरूकूल आरोग्य योगपीठ खरसईचे १८ खेळाडू योगासने खेळात विभाग स्तरावर*
म्हसळा -
म्हसळा तालुक्यातील क्रीडा क्षेत्राचे ओळखले जाणारे खरसई गाव या गावातील नुकत्याच पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत रायगड जिल्हा स्तरावर योगासने खेळात चमकदार कामगिरी करून १८ खेळाडूंनी विभाग स्तरावर मजल मारली आहे. योगासने या क्रिडा क्षेत्रात कौशल्याचे संपूर्ण म्हसळा तालुक्याच्या कानाकोपऱ्यात योगासने खेळाडूंवर कौतुकचा वर्षाव होत आहे.
क्रीडा संकुल रोहा- धाटाव येथे जिल्हा स्तरीय योगासने खेळ पार पडले या खेळात १४ वर्षांखालील कुमार - प्रणय शितकर, किशोर खोत,प्रतिक खोत , सिध्दांत पयेर, उज्वला खोत, जीविका मांदाडकर,नम्रता म्हात्रे, लावण्या शितकर, पुजा खोत, रूतुजा म्हसकर, १७ वर्षांखालील सुरज पाटील , सिध्दी पयेर, मानसी मांदाडकर,, १९ वर्षांखालील - निषा पाटिल, कृतिका पयेर, सेजल माळी,दिव्या खोत , सिध्दी खोत आदी विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर खुप सुंदर नेत्रदीपक कामगिरी करून आज होणाऱ्या जे.बी.एस.पी.संस्थेचे चा.का ठाकूर शैक्षणिक संकुल येथे विभाग स्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये नक्कीच खरसई गावातील विद्यार्थी चांगली कामगिरी करून राज्य स्तरावर जाण्याचे स्वप्न उभं करतील अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नसावी . गेली अनेक वर्षे गुरूकूल आरोग्य योगपीठ खरसई योगासने खेळाचे मार्गदर्शन नियमित करून योगासने खेळाडू सातत्याने तालुका, जिल्हा, विभाग स्तर गाठत आहेत. यासाठी भव्य मार्गदर्शन उत्तम मांदारे सर , हेमंत पयेर सर , सागर शितकर सर मार्गदर्शन करत आहेत. तसेच भरीव योगदान सोमजाई माता क्रीडा मंडळ मुंबई खरसई चे अध्यक्ष चंद्रकांत खोत सहकार्य व मार्गदर्शन करत आहेत. योगासने शालेय स्पर्धेसाठी रा जि प आदर्श शाळा खरसई मराठी शाळेकडून श्री जयसिंग बेटकर सर यांनी अथक परिश्रम घेतले त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल खरसई चे नितीन पाटील सर आणि ज्युनिअर कॉलेज म्हसळा चे मोरे सर,जमदाडे मॅडम यांनी बहुमोल सहकार्य केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मांदाडकर, समिर बनकर, दत्ताराम पयेर , काशिनाथ कोकाटे, जगदीश खोत, गणेश मांदाडकर यांनी विद्यार्थी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या.
*योगासने खेळाचे मानवाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले शरीर सुव्यवस्थित रहाण्यासाठी शरीराला व्यायाम आणि योगासने ची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत म्हसळा तालुक्यातील खरसई गावचे विद्यार्थी सर्वंच खेळात प्राविण्य आहेत त्याचबरोबर योगासने खेळात अप्रतिम कामगिरी करून जिल्हा स्तरावरून विभाग स्तरावर नेतृत्व करत असताना म्हसळा तालुक्याचे व रायगड जिल्ह्याचे नाव विभाग स्तरावर घेऊन जात आहेत. हि बाब भूषणावह आहे.
नक्कीच हे खेळाडू भविष्यात राज्य पातळी गाठून आपल्या म्हसळा तालुक्याचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल*.
*मुख्याध्यापक श्री. पी.एल.हाके सर*
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा*
Comments
Post a Comment