"शिवशौर्य यात्रा”चे पनवेलमध्ये






शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष व विश्व हिंदू परिषद षष्टीपूर्ती निमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पनवेल प्रखंडच्या साथीने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या "शिवशौर्य यात्रा”चे पनवेलमध्ये पनवेल भाजपच्या वतीने पुष्पवृष्टी, ढोलताशाच्या गजरात आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या यात्रेची सुरुवात सिंधुदुर्ग येथून झाली असून त्याची सांगता शिवाजी पार्क मुंबई येथे होणार आहे. पनवेलमध्ये शिवशौर्य यात्रेचे आगमन तक्का झाल्यानंतर तिथून भारतीय जनता पार्टी पनवेल कार्यालय - छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुढे रोडपाली, कळंबोली- कामोठे असे मार्गक्रमण करत बाईक रॅली झाली. यावेळी पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर