पंतप्रधान आवास योजना विभागातील कर्मचारी यांच्या नियुक्तीची चौकशी करून नियुक्ती रद्द करण्याची डॉ.मुनीर तांबोळी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पंतप्रधान आवास योजना विभागातील कर्मचारी यांच्या नियुक्तीची चौकशी करून नियुक्ती रद्द करण्याची डॉ.मुनीर तांबोळी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिकेची एकीकडे भरती प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट कायम करण्यासाठी मनपाने मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तर तिसरीकडे गेल्या सहा वर्षापासून कंत्राटी पद्धतीने राब राब राबणाऱ्या इतर कर्मचारी अभियंत्यांना का सेवेत सामावून घेतले जात नाही. मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांनी यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.कंत्राटी असताना सेवेत सामावून घेण्यास मंजुरी तर इतर अस्थायी स्वरूपाच्या कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. हजारो उमेदवारांनी याकरता अर्ज केले आहेत. पनवेल मनपात गेल्या काही वर्षापासून घाम गाळत असणाऱ्या कर्मचा-यांबाबत कोणताही सहानुभूतीपूर्वक विचार महापालिकेकडून झाला नाही. मात्र पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात मनपाने ठराव सुद्धा केला आहे. त्यांना कायम करून घेण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी मंजुरी दिली आहे. आता हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. माहितीच्या अधिकाराखाली ही बाब उघडकीस आली आहे. या संदर्भात डॉ.मुनीर तांबोळी यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री यांना पत्र पाठवत चौकशीची मागणी केली आहे.पंतप्रधान आवास योजने अंतर्गत समाज विकास तज्ञ म्हणून स्वप्नाली सचिन चौधरी, स्थापत्य अभियंता प्रसाद परब आणि संगणक प्रणाली तज्ञ या पदावर गजानन गोविंदराव देशमुख यांच्या नावावर आयुक्त गणेश देशमुख यांनी शिक्कामोर्तब केले आहे.आता गजानन देशमुख आणि आयुक्त देशमुख यांचे काय संबंध आहेत का याची चौकशी करण्याची मागणी सुध्दा त्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment