सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र या संस्थेचे नियोजित अध्यक्ष मा. मंदारजी कवाडे साहेबयांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरीय काव्य संमेलन स्पर्धा संपन्न
सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र या संस्थेचे नियोजित अध्यक्ष मा. मंदारजी कवाडे साहेबयांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरीय काव्य संमेलन स्पर्धा संपन्न
दि. ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी भव्य राज्य स्तरीय काव्य संमेलन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, तरी
सर्व प्रथम संस्थचे कार्याध्यक्ष चिंतामणी जाधव माजी सचिव राजाभाऊ गमरे यांच्या हस्ते भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुध्दपुजा संपन्न झाली. या काव्य संमेलनात सहभाग घेतलेल्या सर्वच कवी आणि साहित्यकांच्या कवीतांनी अक्षरशः गाजवून सोडले. बहुजन चळवळीची दिशा आणि दशा काय आणि कशी आहे, हे प्रत्येक कवींच्या काव्य कल्पनेतून ऐकायला मिळाले.
(१) प्रथम क्रमांक - म्हसळा तालुक्यातील केलटे गावचे सुपुत्र कवी - विनायक जाधव यांनी पटकावली
(२) दुसरा क्रमांक - महाड तालुक्यातील मांडकी गावचे प्रख्यात कवी विजय पवार यांना मिळाला
(३) तिसरा क्रमांक - मंडणगड तालुक्यातील दहागाव या गावचे कवी सुरेश पवार यांनी मिळविला
(४)चौथा क्रमांक म्हणून उत्तेजनार्थ कवयित्री - संध्याताई गायकवाड यांना मिळाला.
या काव्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून *ईन्दु मिल प्रणेते, बौध्दजन पंचायत समितीचे सभापती आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तसेच रिपब्लिकन सरसेनानी अध्यक्ष मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांची उपस्थिती लाभली.*
त्यांनी रसिकांना आणि कवी, गायकांना मोलाचे मार्गदर्शन करून महाकवी वामनदादा कर्डक यांची आठवण करून दिली असता, "सम्यक कोकण कला संस्थेला" शुभेच्छा दिल्या.
परीक्षक म्हणून डॉ. प्रा. अजय खैरे आणि दिग्दर्शक लेखक राजेश जाधव यांनी परीक्षणाचे काम अचूक करून बौ. प.समिती कार्याध्यक्ष मा. लक्षण भगत साहेब यांनी सुद्धा कलावंतांना मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment