गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केला मोठ्या प्रमाणात गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा गाडीसह हस्तगत



गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केला मोठ्या प्रमाणात गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा गाडीसह हस्तगत

पनवेल,  (संजय कदम) ः गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने खिडूूकपाडा गावाच्या हद्दीतील प्रशांत ढाब्यासमोरील स्टील मार्केटकडे जाणार्‍या रस्त्यावर एक गाडी अडवून त्यामध्ये असलेला मोठ्या प्र्रमाणात गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा हस्तगत केला आहे.

गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वपोनी उमेश गवळी यांना खास बातमीदाराकडून खिडूकपाडा गावाच्या हद्दीत गुटख्याचा साठा घेवून गाडी वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस हवालदार अनिल पाटील, पो.हवा.सचिन पवार, पो.हवा.निलेश पाटील, इंद्रजित कानू, सागर रसाळ, पोलीस शिपाई चालक विक्रांत माळी आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून एका इसमास गाडीसह थांबविले असता त्याच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आल्याने त्याच्या विरोधात आरोग्यास अपायकारक असा महाराष्ट्रात विक्री, साठवणूक व वाहतुकीस प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ बेकायदेशीररित्या व मानवी शरिरास घातक व लोकजिवीतास धोका निर्माण करणार्‍या प्रतिबंधित अन्न पदार्थाचा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर