# नवी मुंबई मेट्रोची अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा संपली # 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथून या मेट्रोचे व्हर्च्युअल उद्घाटन करण्याची शक्यता
# नवी मुंबई मेट्रोची अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा संपली
# 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथून या मेट्रोचे व्हर्च्युअल उद्घाटन करण्याची शक्यता
नवीमुंबई (Panvel) : रायगड मत
नवरात्रीच्या सुरुवातीला झेंडा दाखवून पंतप्रधान मोदी याचे उद्घाटन करतील, असे बोलले जात होते, मात्र मोदी सध्या 4 राज्यांच्या निवडणुकांमुळे मोदींच्या व्यस्त शेड्युलमुळे ते आता पुढे ढकलण्यात आले असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथून या मेट्रोचे व्हर्च्युअल उद्घाटन करण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील लोकांना प्रवासाचा सुखद अनुभव देणारी नवी मुंबई मेट्रोची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. आता लवकरच त्यांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. नवी मुंबई मेट्रो लाईन 1 चा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. बेलापूर ते पेंढार हा 11 किलोमीटरचा पहिला टप्पा प्रवासी सेवेसाठी सज्ज झाला आहे.
मुंबईकरांना 12 वर्षे करावी लागली प्रतीक्षा..
कंत्राटदारांशी संबंधित समस्या, तज्ञांची कमतरता, कायदेशीर आणि तांत्रिक अडथळे आणि निधीची आव्हाने यासह प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सिडकोने आयसीआयसीआय बँकेकडून वित्तपुरवठा करण्यासाठी 500 कोटी रुपयांचे आर्थिक कर्जही घेतले होते. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी सिडकोने 2022 – 23 च्या अर्थसंकल्पात नवी मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी समर्पित जमीन दिली आहे. त्यामुळेच उन्नत नवी मुंबई मेट्रो तयार होण्यासाठी 12 वर्षे लागली.
'रायगड मत' ला मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोकडून मेट्रो सुरू करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र ऑक्टोबर 2021 मध्ये प्राप्त झाले होते, मात्र विविध कारणांमुळे ही सेवा सुरू होऊ शकली नाही. दरम्यान, सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकादरम्यानचे अपूर्ण कामही पूर्ण झाले आहे. 2019 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी 3063 कोटी 63 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. ही मेट्रो चालवण्याची जबाबदारी महा मेट्रोकडे सोपवण्यात आली आहे. 2027 पर्यंत या मार्गावरील प्रवासी संख्या 1 लाखांपर्यंत असणार आहे.
जोडले जाणार - कनेक्टिव्हिटी होणार सुलभ..
ही लाईन सुरू झाल्यानंतर कनेक्टिव्हिटी चांगली होईल. सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळेल. लोकांना प्रवास करणे सोपे जाईल. या मेट्रोचा कमाल वेग ताशी 80 किमी आणि सरासरी वेग ताशी 34 किमी असणार आहे.
# मेट्रो स्टेशनची नावे
# एकूण 11स्टेशन्स..
बेलापूर
सेक्टर -7 बेलापूर
सायन्स पार्क
उत्सव चौक
सेक्टर 11 खारघर
सेक्टर 14 खारघर
सेंट्रल पार्क
पेठापाडा
सेक्टर 34 खारघर
पंचनाद
पेंढार टर्मिनल
Comments
Post a Comment