# पनवेल महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेची तारीख जाहीर; 20 जिल्ह्यात 11 सत्रात होणार परीक्षा # स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे




# पनवेल महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेची तारीख जाहीर; 20 जिल्ह्यात 11 सत्रात होणार परीक्षा

# स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे 


पनवेल: पनवेल महापालिकेच्यावतीने 41 संवर्गातील गट'अ' ते गट 'ड' मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेसाठीची परीक्षा येत्या 8,9, 10,11 डिसेंबरला 11 सत्रांमध्ये होणार आहे. ही परीक्षा पुर्णत: पारदर्शक होणार आहे. परीक्षेबाबत खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवरती महापालिकेच्यावतीने कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.


पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये 377 पदांसाठी एकुण 54 हजार 558 अर्ज अंतिमत: प्राप्त झाले आहेत.टीसीएस मार्फत हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे.या भरती प्रक्रीयेमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी विभागांतील एकुण 377 पदांकरिता ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. येत्या 8, 9,10 11 डिसेंबरला 20 जिल्ह्यामध्ये विविध केंद्रावरती ही परीक्षा होणार आहे. भरती प्रक्रियेबाबत काही समाजकंटकाच्या माध्यमातून व्हॉटस्अपद्वारे खोटे एसएमएस पाठविले जात आहे. अशा समाजकंटकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेच्यावतीने पोलिस विभागास पत्र देण्यात येणार आहे. भरतीबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये. ही भरती प्रक्रिया पुर्णपणे पारदर्शक होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर