# गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन लवकरच # चला मेट्रो ने जाऊ या.... हुश्श!!! झाली बुवा एकदाची.. # तळोजाकडे जाणाऱ्या लोकांनी सोडला मोकळा श्वास..... # येत्या नवरात्र उत्सवात सुरु होऊ शकते मेट्रो # पनवेलकर होणार खूष, दसरा दिवाळीची जबरदस्त भेट # आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष प्रयत्न.


# गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन लवकरच

# चला मेट्रो ने जाऊ या.... हुश्श!!! झाली बुवा एकदाची..


# तळोजाकडे जाणाऱ्या लोकांनी सोडला मोकळा श्वास.....


# येत्या नवरात्र उत्सवात सुरु होऊ शकते मेट्रो


# पनवेलकर होणार खूष, दसरा दिवाळीची जबरदस्त भेट


# आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष प्रयत्न....


नवी मुंबई (रायगड मत)


नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. नवरात्रोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभ हस्ते मेट्रोचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याचे कलेक्टर योगेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली खारघरमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, उद्घाटन सोहळा कधी असेल याची तारीख निश्चित्त करण्यात आली नाहीये. पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप कोणत्याही निश्चित तारखेची घोषणा केली नाहीये.




21 जून रोजीच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सिडकोला मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळं बेलापूर ते पेंढरपर्यंत मेट्रो सेवा सुरू केली जाऊ शकते. तशी तयारीही मेट्रोने सुरू केली आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 3063 कोटींचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, 2019मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेट्रो प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला होता.




नवी मुंबई पोलिस, सिडको आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्घाटन समारंभ 14 किंवा 15 ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेलापूर ते पेंढर पर्यंत 11 किमी पर्यंतचा मेट्रोचा पहिला टप्पा तयार आहे. या मार्गावरील मेट्रोचे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. मेट्रो सुरू करण्यासाठी ऑक्टोबर 2021 मध्ये सीएमआयईएस प्रमाणपत्र मिळाले होते. मात्र विविध कारणांमुळं सेवा सुरू होऊ शकली नव्हती. या दरम्यान सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्थानकात अपूर्ण राहिलेले कामदेखील पूर्ण झाले आहे. 




नवी मुंबई मेट्रोची जबाबदारी महामेट्रोला सोपवण्यात आली आहे. मेट्रोकडून प्रवासीभाडेदेखील ठरवण्यात आले आहे. 2 किमीसाठी 10 रुपये, 2 ते 4 किलोमीटरसाठी 15 रुपये भाडे असेल. त्यांनंतप प्रति 2 किलोमीटरसाठी 5 रुपये भाडे वाढवण्याचा प्रस्ताव आहे. 10 किमीपासून पुढे 40 रुपये भाडे असेल. बेलापूर ते पेंढरपर्यंतचे भाडे 40 रुपये असणार आहे. 




 नवी मुंबई मेट्रो स्टेशनची नावे 




बेलापूर ते पेंढर (तळोजाजवळ) पर्यंत 11 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी 2 स्टॉप आहेत. या मार्गावर बेलापुर, सेक्टर-7 बेलापुर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर 11 खारघर, सेक्टर 14 खारघर, सेंट्रल पार्क, पेथापाड़ा, सेक्टर 34 खारघर, पंचनंद और पेंढर टर्मिनल ही स्टेशन आहेत. 











Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर