आचारसंहिता लागली # महाराष्ट्रात निवडणुकीचं बिगूल वाजलं, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा. # किसमे में कितना है दम # अजित पवार यांचं स्वप्न स्वप्नच राहिले? # आमदारकी आणि खासदारकी : कदाचित या दोन्ही निवडणुका 1 में ते 15 में 2024 दरम्यान होतील. मोदी सरकार चा मास्टर प्लान तयार आहे. कदाचित जानेवारी - फेब्रुवारी पासून आचारसंहिता लागेलं. # बेकायदेशीर शिंदे-भाजप सरकार बरखास्त होणार आहे, मात्र राष्ट्रवादीचा (अजित पवार) यांचा टेकू अगोदरच घेतल्यामुळे 144 च्यावर संख्याबळ होत असल्यामुळे सरकार पडणार नाही. # रायगड मत विशेष बातमी#

 




# आचारसंहिता लागली


# महाराष्ट्रात निवडणुकीचं बिगूल वाजलं, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा.

# किसमे में कितना है दम

# अजित पवार यांचं स्वप्न स्वप्नच राहिले?

# आमदारकी आणि खासदारकी : कदाचित या दोन्ही निवडणुका 1 में ते 15 में 2024 दरम्यान होतील. मोदी सरकार चा मास्टर प्लान तयार आहे. कदाचित जानेवारी - फेब्रुवारी पासून आचारसंहिता लागेलं.

# बेकायदेशीर शिंदे-भाजप सरकार बरखास्त होणार आहे, मात्र राष्ट्रवादीचा (अजित पवार) यांचा टेकू अगोदरच घेतल्यामुळे 144 च्यावर संख्याबळ होत असल्यामुळे सरकार पडणार नाही.


# रायगड मत विशेष बातमी#


मुंबई | आचारसंहिता आतापासूनच लागली आहे. जानेवारी ते में 2024 ला देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहेत. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी ऑक्टोबर 2024 ला आमदारकीची विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. कदाचित या दोन्ही निवडणुका 1 में ते 15 में 2024 दरम्यान एकत्र होतील. मोदी सरकार चा मास्टर प्लान तयार आहेत. मात्र या निवडणुकांआधी आणखी एक महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.


राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 या दिवशी मतदान होणार आहे. याबाबतची घोषणा स्वत: राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.



# निवडणुकीचा कार्यक्रम नेमका असेल? ते आता पाहू या...

“संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल”, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.


5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल, असं यू. पी. एस. मदान यांनी सांगितलं.


# ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व...

निवडणूक आयोगाने जाहीर केलेली ही ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी दरवेळी महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुका पार पडतात.


# पण यावेळी "महापालिका निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. महापालिका निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुका मानलं जातं." पण आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत असल्यामुळे जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे ते ओझरत समजण्याची शक्यता आहे.


प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. दररोज बैठकांचं सत्र सुरु आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांची देखील एकजूट होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात घडणाऱ्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे.


चला तर मग लोकशाही बळकट करू या मतदान करू या. चांगल्या लोकांना निवडून देऊ या. तुमचे एक मत सरकार बदलवू शकते. चांगले उमेदवार द्या आणि चांगली लोकशाही टिकवून ठेवा.


माझे मत, रायगड मत

संपादक : जितेंद्र नटे

raigadmat@gmail.com

संपर्क : 8652654519

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर