पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या तीन महिन्यात विशेष मोहिमे अंतर्गत तीन खुनाचे गुन्हे आणले उघडकीस
पनवेल ( संजय कदम ) : पनवेल शहर ठाण्याच्या हद्दीत ३० वर्षा पूर्वीच्या तीन खुनाचे गुन्हे अवघ्या तीन महिन्यात विशेष मोहिमे अंतर्गत उघडकीस आणले आहे . त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून पनवेल शहर पोलिसांचे कौतुक होत आहे . पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०२ पंकज डहाणे यांनी खुना व इतर गंभीर गुन्हयातील अभिलेखावरील फरारी व पाहिजे आरोपीतांचा शोध घेवून त्यांच्यावर कार्यवाही करण्याकरिता विशेष मोहिम राबविणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस पथक तयार करण्यात आले होते. पोलीस पथकांनी पोलीस ठाणेचे ३० वर्षे जुने अभिलेख पडताळले. असता खून या शिर्षकाखाली दाखल असलेले गुन्हा रजि. नं. ११८/ २०१६ भादवि कलम ३०२, ३४, गुन्हा रजि. नं. २१४ / २०१६ भादवि कलम ३०२, २०१, ३४ व गुन्हा रजि. नं. २१२/१९९४ भादवि कलम ३०२, २०१ ३४ या गुन्हयातील पाहिजे आरोपीचे शोध घेणेकामी स्थानिक बातमीदार व तांत्रिक तपास केला. सदर तपासामध्ये नमुद तिन्ही गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी मिर्झापूर (उत्तर प्रदेश), सिद्धीपेठ (तेलंगणा) व अमृतसर (पंजाब) असे जिल्हयात आपले अस्तित्व लपवुन असल्याचे खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकांनी स्थानिक पोलीस पथकांशी योग्य समन्वय साधुन व त्यांची मदत घेवुन तीन्ही गुन्हयातील पाहिजे आरोपींचा शोध घेवुन त्यांना गुन्हयाचे अधिक तपासकामी ताब्यात घेतले आहे. यापैकी गुन्हा रजि. नं. २१२/१९९४ मधील पाहिजे आरोपी नामे बाऊसिंग हा तपासा दरम्यान मयत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचे मृत्यु प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. सदर कामगिरी मध्ये तीन्ही गुन्हयातील पाहिजे आरोपींचा शोध घेणेकामी पोलीस मित्र/राहुल राठोड यांनी परिश्रम घेवून पोलीस पथकांना पुर्ण मदत केली आहे.वरील कार्यवाही पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी केलेल्या सुचनेनुसार . पोलीस उपआयुक्त पंकज डाहणे, परि ०२, पनवेल व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपुत, पनवेल विभाग यांचे आदेशानुसार तसेच पनवेल शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुम बागवान व पोलीस निरीक्षक ( प्रशा ) प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणे कडील पोउपनि अभयसिंह शिंदे, पोहवा नितीन वाघमारे, पोहवा परेश म्हात्रे ,पोशि प्रसाद घरत, पोना रवींद्र पारधी ,पोशी साईनाथ मोकल ,पोशि नितीन कांबळे आदींसह तपास पोलीस पथकांनी केली आहे. यात त्यांनी बिट्टूसिंग उर्फ अर्जुनसिंग व नगिना उर्फ चंक्कीपांडे सिद्धी कौल ( वय ३४ ) व राजू सिंगसानी या तीन आरोपीना ताब्यात घेतले आहे . फोटो - तीन खूना संदर्भात माहिती देताना पोलीस उपआयुक्त पंकज डाहणे व इतर अधिकारी
Comments
Post a Comment