एमआयएमच्या वतीने नेरूळच्या महापालिका रूग्णालयात फळवाटप
एमआयएमच्या वतीने नेरूळच्या महापालिका रूग्णालयात फळवाटप
नवी मुंबई : ईद ए मिलादनिमित्त नेरूळमधील महापालिकेच्या माताबाल रुग्णालयात एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाज खान व त्यांच्या कार्यकर्त आणि पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी फळवाटप केले.
प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान आणि नवी मुंबई जिल्हा महासचिव समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या फळवाटप कार्यक्रमात रूग्णांना फळवाटप करण्यासाठी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे कोपरखैराणे विभाग अध्यक्ष नाजिम शाह तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रूग्णालयातील
रुग्ण, गर्भवती महिलांना, लहान बालकांना फळवाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. उध्दव खिल्लारे व वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत माने आणि सर्व कर्मचाऱ्यांना भेटून एमआयएम विद्यार्थी आघाडीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
आज दि. २८/०९/२०२३ रोजी AIMIM विद्यार्थी आघाडी नवी मुंबईच्या वतीने हाजी शाहनवाज खान (महासचिव - महाराष्ट्र राज्य) व समीर शेख (महासचिव - नवी मुंबई) यांच्या नेतृत्वाखाली ईद - ए - मिलाद निमित्त "फळे वाटप कार्यक्रम" मीनाताई ठाकरे रूग्णालयात राबविण्यात आला. या कार्यक्रमास कोपरखैरणे विभाग अध्यक्ष नाजिम शाह, त्यांचे सहकारी व आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यानिमित्ताने रूग्णालयातील गरोदर माता व शिशू यांना फळे वाटप करण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ. उध्दव खिल्लारे व वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत माने आणि सर्व कर्मचार्यांना भेटून शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments
Post a Comment