वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा





आदिवासी वसतिगृहातीली समस्याबाबत आदिवासी सेवा संघाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना दिले निवेदन 


वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा


पेण, कर्जत, नेरळ, नागोटणे, सुधागड पाली, पनवेल वसतीगृह प्रवेश प्रक्रियेपासून अनेक विद्यार्थी लाभ ; ६२% गुण असूनही स्थानिक विद्यार्थी मिरीड लिस्टमध्ये नाहीत? विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी

----–--------------

मागणी योग्य आहे, हे निवेदन वरिष्ठांकडे तात्काळ पाठवू आणि आमच्या स्तरावर शक्य होईल तेवढं वसतीगृहातील प्रवेशसंदर्भात कार्यवाही करू - शशिकला आहिरराव

------------------

पनवेल/ प्रतिनिधी :

आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक उन्नती होण्यासाठी व उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आदिवासी वसतिगृहाची निर्मिती केली गेली. या आदिवासी वसतीगृहात शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठं मोठ्या पदावर कार्यरत आहेत. वसतीगृहात शिक्षण घेण्याची शासनाने व्यवस्था केल्याने अनेक गरीब आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थींनीच्या पालकांचा आर्थिक बोजा कमी होत असतो. 

      माञ, इयत्ता १० वी पास झालेल्या विद्यार्थी, विद्यार्थींनी इयत्ता ११वी व पुढील शिक्षण घेण्यासाठी वसतीगृहात प्रवेश अर्ज केले असता अद्यापही काही विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे आदिवासी भागात रहाणा-या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शहरी ठिकाणी यावे लागत असल्याने अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कधी बस मिळत नाही, तर कधी काॅलेजमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पैसे नाहीत. जेवणाचा तर पत्ताच नसतो. त्यामुळे आपले वसतीगृहाचा प्रवेश कधी होतोय? याचीच विद्यार्थी वाट पहात असतात. अर्धा शैक्षणिक वर्षही निघून गेला तरी वसतीगृहाचा प्रवेश होईना. विद्यार्थी व पालक सातत्याने वसतीगृहातील गृहपाल यांना विचारत राहिले. माञ, मिरीड लिस्ट असल्याने आम्ही काहीच करू शकत नसल्याचे अनेकदा गृहपालांनी सांगितले. ६२% असूनही मिरीड लिस्टमध्ये नाहीत मग, आदिवासी विद्यार्थ्यांने करायचं तरी काय??

      याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण येथील प्रकल्प अधिकारी श्रीम. शशिकला आहिरराव व शिक्षक विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. शेलमकर यांना आदिवासी वसतिगृहातील समस्यासंर्दभात आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी निवेदन दिले. पेण प्रकल्प कार्यालया अंतर्गत कर्जत, नेरळ, सुधागड पाली, नागोटणे, पनवेल वसतीगृह आहेत. याठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतांना त्यांना वसतीगृह प्रवेश मिळत नाही. त्यासाठी प्रकल्प अंतर्गत येणा-या सर्व वसतीगृहात प्रवेश प्रक्रियेमध्ये स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावी, अशी मागणी प्रकल्प अधिकारी श्रीम. शशिकला आहिरराव आणि शिक्षण विभागाचे साहायक प्रकल्प अधिकारी श्री. शेलमकर यांच्याकडे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर