सीकेटी स्वायत्त महाविद्यालयात “रिसर्च मेथडोलॉजी” याविषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न





सीकेटी स्वायत्त महाविद्यालयात “रिसर्च मेथडोलॉजी” याविषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे “रिसर्च मेथडोलॉजी” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आज (दि. ३० सप्टेंबर) सूक्ष्मजीवशास्त्र विभाग ,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना अंतर्गत पदव्युतर विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी संपन्न झाली. 


             या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबईचे प्रा.(डॉ.) उल्हास पाटील, कवीयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक प्रा. डॉ.नवीन दंदी, व्ही.ई.एस. कॉलेज, चेंबूरचे सहाय्यक प्राध्यापक, प्रा.श्री. सुमन गांगर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी.आघाव, विज्ञान विद्याशाखा प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर , कार्यशाळेचे समन्वयक व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश वडनेरे आदी उपस्थित होते.


   प्राचार्य डॉ.एस.के.पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि आविष्कार संशोधन अधिवेशनातील संशोधन सुविधा, संशोधनासाठी लागणारा निधी, महाविद्यालयाची उपलब्धी यासह महाविद्यालयाची व्यक्तिरेखा सविस्तर सांगितली तसेच शैक्षणिक व संशोधनातील कामगिरीबद्दल सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे कौतुक केले. प्रा. एन.सी. वडनेरे यांनी कार्यशाळेच्या वेळापत्रकाची रूपरेषा सांगितली आणि उपस्थितांना प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.


प्रा. डॉ. उल्हास पाटील यांनी संशोधन लेखनासाठी वेळ व्यवस्थापन, संशोधनाची गरज आणि फायदे याविषयी सांगितले. संशोधनाचा विषय कसा निवडावा, हायपोथिसिसला कुतूहल निरीक्षणाची गरज आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले. श्री. सुमन गांगर यांनी विद्यार्थ्यांशी सांख्यिकी व सांख्यिकी संशोधनासंबंधीच्या समस्या सोडविण्यास मदत केली. डॉ.नवीन दंदी यांनी विद्यार्थ्यांना शोधनिबंध प्रकाशनाची प्रक्रिया समजावून सांगितली आणि प्रबंधासाठी संशोधन प्रस्ताव लिहिण्याबद्दल आणि एजन्सींना निधी पुरवण्याबद्दल तपशीलवार माहिती दिली.


कार्यशाळेचे सूत्रसंचालन सूक्ष्मजीवशास्त्राची विद्यार्थिनी कु.निशा जांगीड हिने केले तसेच प्रा.नीलिमा तीदार यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ.एस.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे समन्वयक व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश वडनेरे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा. गणेश साठे, प्रा.नीलिमा तीदार, प्रा.अर्चना गांधारकर, प्रा.अन्वेश वेमुला , प्रा. नमिता गरुडे, प्रा. श्वेता हुंबरवाडी आणि शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर