ह्यूमन राईट आणि विश्व प्रस्तुत महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड २०२३ तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न



ह्यूमन राईट आणि विश्व प्रस्तुत महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड २०२३ तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न 

नवी मुंबई (प्रतिनिधी )नवी मुंबई येथील कोर्ट यार्ड मेरिट या पंचतारांकित हॉटेलमध्ये ह्यूमन राईट आणि विश्व प्रस्तुत महाराष्ट्र अवॉर्ड २०२३ तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला असून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि रोशनी कपूर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.याप्रसंगी अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

कौतुक हा केवळ तीन अक्षरी शब्द असला तरी त्यात दहा हत्तीचे बळ असते.कौतुक म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या कार्याची दखल घेऊन त्याबद्दल त्याची प्रशंसा करणे, त्याला प्रोत्साहन देणे, प्रेरणा देणे त्यामुळे त्याच्यातील अत्मविश्वास वाढतो व तो करत असलेले काम अजून चांगल्या पद्धतीने करतो व सर्वस्व पणाला लावून यशस्वी होतो.बरं, कौतुक करणे ही तर किती सोपी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या हातात आहे. ह्याला काही पैसे पडत नाही. फारसे कष्ट करावे लागत नाही अथवा फार वेळही द्यावा लागत नाही. तरी सुद्धा हा अतिशय दुर्लभ गुण आहे जो फारसा पहायला मिळत नाही. हो मात्र हे त्यांनाच शक्य आहे जे अतिशय दिलदार असतात व ज्यांचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व असते. कौतुक करणे हा गुण माणसातील स्वभावाचे दर्शन घडवतो. तो म्हणजे स्वभावातील चांगुलपणा व मोठेपणा.दुसऱ्याचे कौतुक करायला फार मोठे मन असावे लागते. काही व्यक्तींना हे अगदी सहज जमते. केलेल्या प्रशंसेमुळे त्या व्यक्तीला एक सकारात्मक ऊर्जा मिळते ज्यामुळे अशक्य गोष्टी देखील शक्य करण्याचे सामर्थ्य मिळते.हेच उद्दिष्ट ठेवून ह्यूमन राईट आणि विश्व् ही संस्था गेल्या २४ वर्षापासून सामाजिक क्षेत्रा बरोबरच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कौन्सिलिंगचं अत्यंत उत्तम काम करते. 

ह्यूमन राईट संस्थेच्या माध्यमातून सामाजिक आणि विश्व या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक ही संस्था गेल् अत्यंत उत्तम काम करत आहे.विश्व् या संस्थेला २४ वर्षे पूर्ण झाली असून आजवर या संस्थेच्या माध्यमातून जवळपास ५००० डॉक्टरांचं या संस्थेच्या माध्यमातून उज्वल भविष्य निर्माण झाला आहे.दरवर्षी ही संस्था शेकडो विद्यार्थ्यांना भारतात तसेच भारताबाहेर वैद्यकीय शिक्षणा साठी पाठवत असते.वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कौन्सिलिंग करणारी एक विश्वसनीय संस्था म्हणून याकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन आहे.

कोट

गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात ह्यूमन राईट आणि विश्व या संस्थे च्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून समाजातील सर्व क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटावणाऱ्या कर्तृत्व्वान व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रसाद महादेव कमळाकर

संचालक विश्व मेडिकल ऍडमिशन पॉइंट

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर