तालुका विधी सेवा समिती, पनवेल यांच्या वतीने तळोजा मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
तालुका विधी सेवा समिती, पनवेल यांच्या वतीने तळोजा मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पनवेल (रायगड मत)
तालुका विधी सेवा समिती, पनवेल यांच्या वतीने दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 : 00 वाजता, तळोजा मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पनवेल तालुका विधी सेवा समिती, अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश माननीय श्री. जयराज वडणे साहेब यांनी या शिबिराचे अध्यक्षस्थान भूषविले या शिबिरात पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ, खजिनदार ॲड. धनराज तोकडे,ऑडिटर ॲड. विशाल मुंडकर,सदस्य ॲड.भूषण म्हात्रे, सदस्य ॲड.अमित पाटील, सदस्या ॲड. छाया म्हात्रे उपस्थित होते.
या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगतात सन्माननीय न्यायाधीश महोदयांनी महात्मा गांधींनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गांवर आपण चालले पाहिजे. कर्तव्य बजावणारा एक सुजाण नागरिक म्हणून आपण यापुढे कार्यरत राहण्यासाठी सक्रिय असायला हवे. राष्ट्र पुढे नेणाऱ्या आदर्शांचे आपण पाईक झालो पाहिजे या अशयाचे मनोगत व्यक्त केले,
पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ यांनी देश सुजाण नागरिकांच्या जोरावर पुढे जात असतो, सुजाण नगरीक म्हणून आपले वर्तन कसे असायला हवे, आपली कर्तव्य काय असायला हवीत, जेणेकरून आपण राष्ट्रनिर्मितीत आपलं सक्षम योगदान देऊन देश पुढे नेऊ शकू या आशयाचं मनोगत व्यक्त केले.
मुख्य मार्गदर्शक म्हणून जेल ड्युटी कौन्सील ॲड. महेश गुंजाळ सर यांनी उपस्थित बंदिवान कैद्यांना प्लि बार्गेनिंग, कैदी व न्यायालयीन कैदी त्यांचे हक्क , जामीनाची तरतुद अश्या बहुवीध आयामांनी विषयाची मांडणी केली. सोबत ॲड. इंद्रजित भोसले यांनी जामीन संदर्भात अतिशय सुरेख मार्गदर्शन केलें. पी. एल. व्ही. श्री. शैलेश कोंडसकर यांनी आभारप्रदर्शन केले.
या कार्यक्रमास विधी समितीचे रिटेनर लॉयर ॲड. सुयश कामेरकर,ॲड. वैशाली भिंगारकर,ॲड.देशकर ॲड.राकेश म्हात्रे आणि इतर नियुक्त वकील उपस्थित होते.
Comments
Post a Comment