शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन झाले सुरळीत
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन झाले सुरळीत
पनवेल (संजय कदम) : दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जनवेळेस नागरिकांना वीज व बेशिस्त पार्किंग यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आज होणाऱ्या शहरातील वडाळे तलाव परिसरातील पाच दिवसाच्या गणरायाचे विसर्जनासंदभार्त नागरिकांना अडी-अडचणी निर्माण होऊ नये म्हणून सकाळीच शिवसेनेचे स्थानिक नेते, पोलीस मित्र चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पनवेल शहर पोलीस निरीक्षक अंजुम बागवान तसेच एमएसईबी अधिकाऱ्यांसह रस्त्यावर उतरून आज होणाऱ्या विसर्जना संदर्भात आवश्यक बाबींची पूर्तता केली. यावेळी शिवसेना शहर संघटक अभिजित साखरे उपस्थित होते. यासर्वांच्या प्रयत्नामुळे भाविकांच्या लाडक्या गणरायाचे विसर्जन सुरळीत झाले.
दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन वेळेस पनवेल शहरात तब्बल दोन ते तीन तास वीस गायब होती. तसेच पोलीस व वाहतूक पोलीस यांनी नियोजन चांगले केले परंतु तरीही काही नागरिकांनाच्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहन कोंडी निर्माण झाली होती. दीड दिवसाच्या विसर्जनावेळी झालेला त्रास भाविकांना पुन्हा होऊ नये म्हणून शिवसेनेचे स्थानिक नेते- पोलीस मित्र चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पनवेल शहर पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, यांच्यासह एमएससीबी अधिकाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आज होणाऱ्या विसर्जना संदर्भात आवश्यक बाबींची पूर्तता केली. तसेच आवश्यक ती सर्व पूर्वतयारी व काळजी घेण्यासंबंधीच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे विसर्जन बंदोबस्तासाठी असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाणीसह अल्पोहारची व्यवस्था केली होती.
फोटो : पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांना सूचना देताना शिवसेनेना नेते चंद्रशेखर सोमण
Comments
Post a Comment