सेवाश्री पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित* "रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे सन्मान"

 


सेवाश्री पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित*

"रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे सन्मान" 


 पनवेल : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंटरच्या माध्यमातून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा आणि सेवाभावी संस्थांचा सेवाश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर तेथे जाऊन .प्रितम म्हात्रे यांनी सर्वप्रथम दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्रीक्षेत्र पंचायतन मंदिरामधून युद्ध पातळीवर एन.डी.आर.एफ टीम, प्रशासन,पोलीस, सामाजिक संस्था तसेच स्थानिक नागरिक यांच्या कडून बचाव व मदत कार्य सुरु होते त्या ठिकाणी ते स्वतः जातीने उभे होते.       

         त्यांना मंदिराच्या माध्यमातून प्रशासनाला मदतकार्यात आवश्यक ती मदत त्यांनी केली. मदतकार्य करणारे कलेक्टर ऑफिस, NDRF टीम , पोलीस अधिकारी , प्रांत ऑफिस, तहसील ऑफिस, इतर शासकीय यंत्रणा मधील पदाधिकारी यांची सुद्धा अन्नसेवा आणि राहण्याची व्यवस्था पनवेलचे माजी.नगराध्यक्ष.जे एम म्हात्रे(भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतम म्हात्रेनी केली. तसेच मदत कार्य करणाऱ्या सेवकांना कुठलीही मदतीची आवश्यकता असेल तर त्यांनी स्वतःच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन केले. दुर्घटनाग्रस्त बांधव जेव्हा मंदिरामध्ये वास्तव्यास होते त्यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी त्यांची संपूर्ण पालकत्व म्हणून जबाबदारी घेतली. त्यांच्या या कार्याबद्दल जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष.प्रितम जनार्दन म्हात्रे यांचा आज रोटरी क्लब पनवेल सेंट्रल तर्फे सेवाश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

          यावेळी बोलताना.प्रितम म्हात्रे यांनी सांगितले समाजात वावरताना नेहमीच आपल्या स्वतःच्या प्रगती बरोबरच या समाजाचे सुद्धा आपण काही देणे लागतो हे आपण विसरू नये अशी शिकवण मला माझे बाबा जे एम म्हात्रे यांच्याकडून मिळाली त्यानुसारच आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून कार्य करत असतो . रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या वतीने इर्शाळवाडी दुर्घटनेत जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याबद्दल आज मला सेवाश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल मी संपूर्ण रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे आभार मानतो. हा पुरस्कार मी, माझ्या या कार्यात मोलाचा सहकार्य करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना, संस्थेच्या स्वयंसेवकांना तसेच इतर सर्व संस्था ज्यांनी मदतीचा हात पुढे केला त्यांना समर्पित करतो. 

        यावेळी माजी प्रांतपाल डॉ.गिरीश गुणे, रो.संजीवनी गुणे , अध्यक्ष रो.रतन खरोल, सचिव रो.अनिल खांडेकर, शेकाप पनवेल म.न.पा चिटणीस रो.गणेश कडू, माजी अध्यक्ष रो.लक्ष्मण पाटील, रो.ठकेकर सर, रो.संतोष घोडींदे तसेच अन्य रोटेरियन उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर