पनवेलच्या स्पेशल News ताज्या बातम्या @रायगड मत
पनवेलच्या स्पेशल News ताज्या बातम्या @रायगड मत
प्रतिनिधी : संजय कदम
कक्ष 3 गुन्हे शाखेकडुन घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्हयातील 02 आरोपींकडून 12 गुन्हयांची उकल
12,16,421/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
पनवेल, (संजय कदम) ः कक्ष 3 गुन्हे शाखेकडून घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केल्याने त्यांच्याकडून 12 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे व जवळपास 12 लाख 16 हजार 421 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत बेलापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अज्ञात इसमांनी घरफोडी चोरी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन व इतर वस्तू असा एकुण 07,50,000/- रू कि.चा मुद्देमाल चोरी झाले बाबत दिलेल्या तक्रारीवरून बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त, मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) अमित काळे, सहा. पोलीस आयुक्त, गजानन राठोड, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे कक्ष 3, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल देवळे, सपोनि ईशान खरोेटे, पोउपनिरी आकाश पाटील, पोउपनि सुशील मोरे, अंमलदार पोहवा मोरे, पोहवा पाटील, पोहवा पाटील (तांत्रीक तपास), पोहवा सचिन धनवटे, पोहवा पाटील, पोना राजेश मोरे, पोशि सावंत, पोशि तांदळे, पोना सोनवलकर आदींच्या पथकाने गुन्हयाचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तसेच बातमीदार यांचेकडून प्राप्त माहिती व तांत्रिक तपास या आधारे वर नमुद दाखल गुन्हयात आरोपी हैदर अनारुल शेख कळवा, ठाणे, व युसुफ नुर इस्लाम शेख वय 26 वर्षे, मुंब्रा जि.ठाणे यांचा सहभाग निष्पन्न झाला. आरोपी गुन्हा केल्यानंतर त्यांचे मुळ गावी मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल या ठिकाणी रेल्वेने पळून जाण्याचे प्रयत्नात असताना त्यांना वर्धा रेल्वे स्टेशन येथे गितांजली एक्सप्रेसमधून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडे केलेल्या तपासात एकूण 12 गुन्हे उघडकीस आले त्यामध्ये पनवेल शहर, सीबीडी, कळवा, ठाणे लोहमार्ग, कोपरखैरणेे, एनआरआय, सानपाडा, रबाळे आदी परिसरातील गुन्हे उघडकीस आले आाहेत. व त्यांच्याकडून जवळपास 12 लाख 16 हजार 421 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
फोटो ः गुन्हे 3 पोेलिसांचे पथक आरोपीसह
---------------
पनवेल मधील खड्यांचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेनेकडून करण्यात आला सत्कार; महानगरपालिकेचा केला निषेध
पनवेल (वार्ताहर) : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात पनवेल शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते असे चित्र संपूर्ण पनवेल परिसरात दिसून येत आहे. पनवेल महानगर पालिकेच्या या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी आज पनवेल शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेनेकडून खड्ड्यांचा विशेष सत्कार करून पनवेल महानगरपालिकेचा निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा सल्लगार शिरीष बुटाला, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, शहर प्रमुख प्रवीण जाधव, संघटक राकेश टेमघरे, ग्राहक कक्ष तालुकाप्रमुख कुणाल कुरघोडे, उपशहर प्रमुख सुजन मुसलोडकर, विभाग प्रमुख अमित माळी, संकेत बुटाला, युवासेना महेश भिसे, उपविधानसभा अधिकारी जितेंद्र सिंधू, नवीन पनवेल शहर युवासेना निखिल भगत, शहर प्रमुख युवासेना साई पवार, शहर समन्वयक सतीश पाटील, उपशहर युवासेना अमेय ठाकरे, विभाग प्रमुख कुणाल नाईक, ग्राहक कक्ष उपविभाग अक्षय तांबोळी यांच्यासह शिवसैनिक व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांच्या भोवताली रांगोळी काढून तसेच त्या खड्ड्यांवर फुलांचा वर्षाव करीत पनवेल महानगर पालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यात आला.
-------------------
श्री साई नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शालेय साहित्यांचे वाटप
पनवेल (संजय कदम) : सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने यांच्या ४८ व्या वर्षी पनवेल परिसरातील ६०० शालेय विद्यार्थ्यांना पनवेल रेल्वे स्टेशन जवळील साईबाबा मंदिरात आज शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
श्री साई नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट, श्री साई नारायण बाबा आश्रम, श्री साई बाबा मंदिर पनवेल यांच्यावतीने यांच्या ४८ व्या वर्षी सद्गुरू साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने पनवेल परिसरातील गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांसह शाळेचा गणवेश व दप्तरचे वाटप पनवेल महानगर पालिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा नगरसेवक अजय बहिरा, शास्त्रीजी विश्व्नाथ भट, रामलाल चौधरी, राम थदानी, साईसेवक रमेश भोळे, पत्रकार संजय कदम, डॉ. शकुंतला आदी मान्यवरांसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते. यावेळी प्रथमच श्री सैनारायन बाबा यांनी लिहिलेल्या ज्ञानसागर पुस्तकाचे मोफत वाटप उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना करण्यात आले.
फोटो : श्री साई नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शालेय साहित्यांचे वाटप
--------------------------
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी/विद्यार्थीनीना वेगवेगळ्या विषयातून करण्यात आली जनजागृती
पनवेल ( संजय कदम ) : पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील केवाळे हरीग्राम, पनवेल येथील सरस्वती एज्युकेशन फाऊंडेशन विद्याधिराज चॅरिटेबल ट्रस्टचे, कृष्ण अकॅडेमी हायस्कूल या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थी/विद्यार्थीनीना वेगवेगळ्या विषयातून जनजागृती करण्यात आली .
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विवेक भोईर यांनी उपस्थित विद्यार्थी/विद्यार्थीनी यांना गुड टच व बॅड टच याविषयी तसेच अंमली पदार्थाचे मानसिकतेवर होणारे दुष्परिणाम या विषयी मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे पोलीस विभागांकडून समाजासाठी दिल्या जाणा-या सेवेबाबत माहिती देण्यात आली व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस मदतीकरीता डायल 112 चे महत्व सांगून जनजागृती करण्यात आली, सदर वेळी 15 शिक्षक 200 ते 250 विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो - पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून जनजागृती
-------------------
आगामी सण उत्सवानिमित्त पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने हद्दीतील पोलिस पाटील महिला दक्षता समिती सदस्य यांची समन्वय बैठक संपन्न
पनवेल ( संजय कदम ) :पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील ,महिला दक्षता समिती सदस्य, यांची समन्वय बैठक पनवेल तालुका पोलीस ठाणे, मंथन हॉल येथे घेण्यात आली.यावेळी आगामी सण उत्सवानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले .
यावेळी बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती, सण - उत्सव, पावसाळा, धरणे, धबधबे, अवैद्य धंदे, भाडेकरू, संशयित इसम वाहने इत्यादी बाबत सुरक्षेच्या अनुषंगाने तसेच लोकसहभागातून हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसून गावाची सुरक्षेच्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरी. पोनी ( गुन्हे ) शेलकर व पोलीस उप निरीक्षक माधव इंगळे यांनी उपस्थितांना महत्वाच्या सूचना केल्या त्यामध्ये प्रामुख्याने जेष्ठ नागरीक , महिला व लहान मुले यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टीने लोक सहभागातून जास्तीत जास्त सी सी टीव्ही कॅमेरे बसविणे तसेच भाडेकरू ची माहिती देणे , येणारे सण उत्सव व सध्याची राजकीय परिस्थिती च्या अनुषंगाने गावातील विशेष घटना या बाबत माहिती देणे. ग्रामीण भागात गावठी दारू, अवैध धंदे, ईत्यादी माहिती देणे.सध्याचे पावसाळी वातावरण असल्याने पाणी थांबणारे ठिकाणे, धबधबे, धरणे, ईत्यादी ठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. त्याचे सुरक्षाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे कडून मनाई आदेश फलक प्रसारीत केला आहे. तसेच दरड कोसळणारे ठिकाणाची माहिती , पाणी साचणारे ठिकाण व त्यातून जीवित हानी होऊ नये याकरिता त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस मदतीकरीता डायल 112 या क्रमांकावर संपर्क करण्यात यावा, तसेच प्रत्येक गावातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न असल्यास फोन द्वारे किंवा पोलीस पाटील यांच्या ग्रुप वर शेअर करावा बाबत माहिती देण्यात आली त्याच प्रमाणे संशयित इसम, बेवारस वाहन, संशयित वस्तू, ईत्यादी माहिती देण्याबाबत योग्य त्या सूचना यावेळी देण्यात आल्या . आयोजित बैठकीस हद्दीतील एकूण 35 पोलिस पाटील , महिला दक्षता समिती सदस्य उपस्थित होते.
फोटो - पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने हद्दीतील पोलिस पाटील महिला दक्षता समिती सदस्य यांची समन्वय बैठक
-----------------
कळंबोली वाहतूक शाखेच्या तप्तरतेमुळे अवघ्या दोन तासात हरवलेला मोबाईल मिळाला परत
पनवेल ( वार्ताहर ) : कळंबोली वाहतूक शाखेच्या तप्तरतेमुळे चार चाकी गाडीत विसरलेला मोबाईल फोन सदर प्रवाश्याला अवघ्या दोन तासात परत मिळाल्याने त्याने कळंबोली वाहतूक शाखेचे आभार मानले आहेत .
अभय पाटील हे काही कामानिमित्त जयसिंगपूर येथून कामोठे येथे आले होते सदरचे काम ऑटोपून ते मॅकडॉनल्ड येथून खाजगी चार चाकी वाहनाने पुणे येथे गेले परंतु पुणे येथे उतरत असताना त्यांचा मोबाईल त्याच गाडीत विसरल्याने त्यांना आढळून आले. त्यावेळी त्यांनी गाडीचा शोध घेतला परंतु गाडी मिळून आली नाही सदर वेळी त्यांनी त्यांचे नवी मुंबई ओळखीचे अमित रणदिवे यांना संपर्क करून माहिती दिली त्यानुसार रणदिवे यांनी कळंबोली वाहतूक शाखेचे अतुल शिंदे यांना माहिती दिली त्वरित पोलीस हवालदार शिंदे यांनी वपोनि, बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मॅकडोनाल्ड बीटचे अंमलदार सोमनाथ गायकवाड यांना संपर्क करून माहिती दिली त्यावेळी नमूद दोन्ही अंमलदार यांनी तात्काळ मॅकडोनाल्ड येथे जाऊन पेट्रोल पंपाचे सीसीटीव्ही द्वारे गाडी नंबर प्राप्त करून त्यावरून संपर्क क्रमांक मिळून त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काही वेळाने फोन उचलला व सदरचा फोन हा सायलेंटवर असून गाडीतच विसरले त्यांनी सांगितले व आणून देत असल्याचे सांगितले त्यानंतर सदर गाडी मालकाने तो मोबाईल चौकीत जमा केला, सदरचा मोबाईल पाटील यांचे नातेवाईक अमित रणदिवे यांच्या ताब्यात सुस्थितीत देण्यात आला .
फोटो - कळंबोली वाहतूक शाखेच्या तप्तरतेमुळे अवघ्या दोन तासात हरवलेला मोबाईल मिळाला परत
-----------------------
वृद्ध इसम बेपत्ता
पनवेल ( संजय कदम ) : एक ८५ वर्षीय वृद्ध इसम कोणास काहीएक न सांगता राहत्या घरातून कोठेतरी निघून गेल्याने ते हरविल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
श्रीरंग लक्ष्मण लोंढे असे या वृद्ध इसमाचे नाव असून उंची ५ फूट , डोक्यास टक्कल व केस पांढरे ,डोळे घारे ,नाक सरळ ,बांधा सडपातळ असून अंगात पांढऱ्या रंगाची व तपकिरी रंगाचा बर्मोडा ,पायात काळ्या सॅन्डल , डाव्या पायाला जखमेचा व्रण व त्यांना मराठी भाषा अवगत आहे . या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी रबाळे पोलीस ठाणे किंवा पोहवा संदीप नवले यांच्याशी संपर्क साधावा .
फोटो - श्रीरंग लक्ष्मण लोंढे
-------------------------------
जाणीव एक सामाजिक संस्थेतर्फे गीत रामायण
पनवेल (वार्ताहर): आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रावर आधारित सामगंध प्रस्तुत गीत रामायण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांना श्री रामाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ आणि शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, संस्थेचे संस्थापक माजी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, माजी पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, सुलोचना कल्याणकर, भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ओबीसी युवा मोर्चा उत्तर रायगड अध्यक्ष प्रसाद म्हात्रे, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, उमेश इनामदार, प्रसाद कंधारे, रूपेश नागवेकर, महेश सरदेसाई, सचिन नाझरे, चंद्रकांत पाटील, प्रितम म्हात्रे, विजय डिसोझा, नरेंद्र सोनावणे, डॉ. एस. टी. गडदे, यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो: गीत रामायण
------------------------------------
पनवेल मध्ये श्रीमद दासबोध ग्रंथावरील अभ्यासपूर्ण व्याख्यानमालेचे आयोजन
११ ते १४ ऑगस्ट रोज संध्या.६ः३० ते ८ः३० वाजता तथास्तू हॉल पनवेल येथे..
पनवेल / प्रतिनिधी : -
अधिक श्रावणमासानिमित्त श्री कपिकूल सिध्दपिठम्, पनवेल केंद्रातर्फे तथास्तू हॉल, पनवेल येथे १००८ श्रीमहंत तपोमुर्ती सद्गुरू वेणाभारती महाराज यांच्या अमृतवाणीतून भाविकांसाठी नवविधा भक्तितून जीवन सार्थकता या प्रवचनमाले अंतर्गत ग्रंथराज श्रीमद् दासबोध या ग्रंथावरील अभ्यासपूर्ण व्याख्यानमाला दिनांक ११ ऑगस्ट ते दिनांक १४ ऑगस्ट दरम्यान रोज संध्याकाळी ६ः३० ते ८ः३० या वेळात तथास्तू हॉल, पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे.
तसेच दि.१६ व १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ८ या वेळेत निसर्गोपचार कँपचे आयोजनही करण्यात आले आहे. या कँपमधे आहार मार्गदर्शन, मसाज, फेशियल्स,तसंच स्वदोष निवारण यावर श्री कपिकुल सिद्धपिठमच्या उत्तराधिकारी श्रीकृष्णमयी यांच्याकडून मार्गदर्शन होणार आहे.
अधिक श्रावण महिन्यात आलेल्या या संधीचा लाभ भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून घ्यावा,असं आवाहन उत्तराधिकारी श्रीकृष्णमयी यांनी केलं आहे. याचबरोबर पनवेल मधे विविध ठिकाणी गुरूपुजन, सत्संगाचे कार्यक्रम,सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले असून अध्यात्मिक साहित्य, निसर्गोपचार,व गुरुदर्शनाकरीता ८२०८३६२९५०, ८३६९८०३०९०, ९३२३४७८६५८ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------------
Comments
Post a Comment