देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्जिन, जीवंत काडतुसे यांची उत्तर प्रदेशातून बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता आलेेल्या दोघा जणांना मुुंब्रा पोलिसांनी केले गजाआड




देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्जिन, जीवंत काडतुसे यांची उत्तर प्रदेशातून बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता आलेेल्या दोघा जणांना मुुंब्रा पोलिसांनी केले गजाआड

पनवेल, (संजय कदम) ः देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्जिन, जीवंत काडतुसे यांची उत्तर प्रदेशातून बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता आलेेल्या दोघा जणांना मुुंब्रा पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या अटकेमुळे मोठ्या प्र्रमाणात इतर गुन्हेगारी उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेे.

मुंब्रा पोलीस ठाण्याचे एन.डी.पी.एस. पथकास कौैसा पेट्रोल पंप कौसा मुंब्रा या ठिकाणी दोन इसम देशी बनावटीचेे पिस्टल विक्री करीता घेवून येणार असल्याची माहिती मिळताच वपोनि निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक नितीन भोसले, पो.अंमलदार धनंजय घोडके, प्रमोद जमदांडे, अजित येळे, सुकदेव देवकर आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी इसम मोहम्मद हाशीम इस्त्राईल खान (29 रा.फत्तेहपूर) व त्याचा सहकारी मोहमद रजा मोहमद वजी खान (24 रा.फत्तेहपूर) या दोघांंना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्जिन, जीवंत काडतुसे तसेच त्यांच्या सोबत असलेली बुलेट मोटार सायकल असा मिळून जवळपास 1 लाख 46 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले करीत आहेत.

फोटो ः अटक केलेले आरोपींसह मुंब्रा पोलिसांचे पथक

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर