बेंचप्रेस जिल्हा क्लासिक स्पर्धेत अमृता भगत अक्षय शनमोगम जय आणि तन्मय पाटील विजेते
बेंचप्रेस जिल्हा क्लासिक स्पर्धेत अमृता भगत अक्षय शनमोगम जय आणि तन्मय पाटील विजेते
पेण (रायगड मत)
पेण येथे दिनांक 16 /8 /2013 जिल्हास्तरीय क्लासिक सब ज्युनियर ज्युनिअर सीनियर आणि मास्टर पुरुष व महिला बेंचवे स्पर्धा पार पडली सदर स्पर्धा ही सार्वजनिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज पेण या ठिकाणी झाली.
या बेंच प्रेस स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील जवळ जवळ 70 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता या स्पर्धेत महिला गटामध्ये अमृता भगत पॉवर हाऊस खोपोली स्ट्रॉंग वुमन झाली सब ज्युनिअर मुलांमध्ये जय पाटील संसारे फिटनेस हा सब ज्युनिअर स्ट्रॉंग बॉय या की दाबाचा मानकरी झाला ज्युनियर मुलांमध्ये तन्मय पाटील ज्युनियर स्ट्रॉंग बॉय संसारे फिटनेस पेन आणि सीनियर पुरुष गटात अक्षय शनमोगम स्ट्रॉंग मॅन सीनियर हे अंतिम सर्वोत्कृष्ट ठरले त्याबद्दल त्यांना किताब प्रदान करण्यात आले
पनवेल येथील शिवगिरी सेवा संस्थान यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादा उर्फ दिलीप खोत यांचे स्मरणार्थ विजेत्यांना पदक व चषक दिले.
या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय पंच शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सेक्रेटरी श्री संजय सरदेसाई यांचे उपस्थितीत झाले त्याप्रसंगी पेन मधील डॉक्टर अशोक भोईर (सामाजिक कार्यकर्ते वृक्षमित्र योग गुरु) यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ज्युनिअर कॉलेजचे प्रिन्सिपल श्री नाईक सर हे उपस्थित होते विविध गटांमध्ये अत्यंत चुरशीची अशी ही बेंच प्रेस स्पर्धा पार पडली या स्पर्धेसाठी मुंबईहून गोपीनाथ पवार अंकुश सावंत सुरेश धुळप उत्तम धुरी आणि मुंबई उपनगर मधून विशाल मुळे राजेश शिर्के हे पंच आले होते या स्पर्धेचे सांघिक विजेतेपद आयर्न मॅट जिम खोपोली आणि उपविजेतेपद संसारे फिटनेस पेण यांना मिळाले या स्पर्धेसाठी यशवंत मोकल कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन भालेराव अरुण पाटकर माधव पंडित राहुल गजरमल संदीप पाटकर यांनी खूप परिश्रम घेतले तसेच सहाय्यक म्हणून सुभाष टेंबे स्थानिक राष्ट्रीय खेळाडू राजेश अंगद यांनी मोलाचे सहकार्य केले आणि स्पर्धा यशस्वी केली .
Comments
Post a Comment