झाडाचा वाढदिवस साजरा करून वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश




झाडाचा वाढदिवस साजरा करून वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश

कळंबोली येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांचा केक कापून केला झाडांचा वाढदिवस साजरा.

पनवेल:( प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि रक्षण आपले कर्तव्य मानून स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी

 कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजार परिसरात वृक्षारोपण केलेल्या झाडांचा मंगळवारी उत्साही वातावरणात वाढदिवस साजरा केला. अनोख्या पद्धतीने केलेल्या वाढदिवसाला लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण संवर्धनामध्ये विशेष रुची असलेल्या रामदास शेवाळे प्रतिष्ठान व छत्रपती एकता गृप लोखंड बाजार कळंबोली च्या अनेक पर्यावरण प्रेमीनी लोखंड पोलाद बाजार व कळंबोली परिसरात विविध वृक्षारोपण केले आहे. आठ वर्षापूर्वी रोपण केलेल्या रोपांचे मोठ्या वृक्षात रुपांतर होऊ लागले आहे. त्याचा आनंद प्रत्येक पर्यावरणप्रेमीची चेहऱ्यांवरुन ओसंडून वाहत होता. यावेळी रामदास शेवाळे यांच्याहस्ते केक कापल्यानंतर वृक्षांना सेंद्रिय खत देण्यात आले. या वेळी झाडांची निगा राखणार्यां वाहनचालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच  वृक्षांच्या संगोपनासाठी तत्पर असणाऱ्या शिवछत्रपती एकता गृप च्या सदस्यांचाही या वेळी गौरव करण्यात आला.यावेळी रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत फाळके, शिवसेना कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, शंकर विरकर माजी नगरसेवक राजुशेठ शर्मा, लहूशेठ मकमिर  विराट पवार, सुधिर ठोंबरे,ओमकार बळीप,वैभव लोंडे,दिपक कारंडे,प्रेम गोडसे,पंकज सुर्यवंशी,दीपक भोसले, बाळू राऊत,विठ्ठलशेठ नेवसे,भानुदास भोसले,अंकुश गायकवाड,त्रिंबक आडसुळ,सुनिल ननावरे, लाला धायगुडे, किसन भोसले,दत्ता शिंदे उपस्थित होते.

कोट

पर्यावरण संरक्षणासाठी

वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. त्याच बरोबरच लावलेले वृक्षसंवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. आजच्या काळामध्ये प्रदूषण आणि ग्लोबर वार्मिंगचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन आणि वृक्ष संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे.भविष्यात वृक्ष टिकले नाहीत तर आपणही टिकणार नाही. मुलांप्रमाणे झाडांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. निसर्गाबरोबर राहण्यासाठी वृक्षलागवड ही सुवर्णसंधी आहे.

रामदास शेवाळे 

शिवसेन जिल्हाप्रमुख पनवेल

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर