पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे हे महत्वाचे ठरणार -आ.प्रशांत ठाकूर





पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे हे महत्वाचे ठरणार -आ.प्रशांत ठाकूर*

पनवेल  (संजय कदम): पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहरामध्ये गर्दीच्या व महत्वाच्या ठिकाणी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बाजवणार असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी करते वेळी केले. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांचे वपोनि नितीन ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांच्यासोबत उमेश इनामदार व प्रकाश खैरे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

       पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना पनवेल शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी सद्य स्थितीत बसवण्यात आलेल्या ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आणि त्यांचा कंट्रोल रूम पनवेल शहर पोलीस ठाण्यात नैमुद्दीन शेख (रिंटू) सीसीटीव्ही टेक्निशयन यांच्या माध्यमातून बसवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच आधुनिक पद्धतीने या वॉर रूम मध्ये आगामी काळात स्पीकर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याद्वारे एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्यास किंवा कोणती दुर्घटना घडल्यास या कंट्रोल मधूनच स्पीकरच्या माध्यमातून पोलीस मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथमच पनवेलमध्ये राबवला जाणार असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांनी दिली. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कंट्रोल रूमची पाहणी केली. शहरातील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ, सराफ बाजार, मिरची गल्ली, आदी ठिकाणच्या वाहतूक कोंडी संदर्भात सुद्धा चर्चा झाली व लवकरच वाहतूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी सणासुदीच्या काळामध्ये शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पनवेल शहरात अजूनही जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असल्याने यांसंदर्भात सुद्धा आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले.

फोटो : सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी करताना आ.प्रशांत ठाकूर


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर