#23 ऑगस्ट उद्यापासून राजपुत्र अमित ठाकरे यांचा झंजावात #मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेची पदयात्रा, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात निघणार! #भाजप x विरुद्ध मनसे गणपतीमध्ये बारी रंगणार


#23 ऑगस्ट उद्यापासून राजपुत्र अमित ठाकरे यांचा झंजावात

#मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेची पदयात्रा, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात निघणार!

#भाजप x विरुद्ध मनसे गणपतीमध्ये बारी रंगणार 


मुंबई :

राज ठाकरे यांनी दिला होता इशारामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. तसेच या मुद्द्यावरुन विविध प्रकारचे आंदोलन करण्याचे आदेश सुद्धा राज ठाकरे यांनी दिले होते. राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर मनसे खड्ड्यांच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.


 गेल्या 15 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा हायवे साठी मनसेकडून पदयात्रा काढण्यात येणार आहे. २३ ते ३० ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर मनसेची ही पदयात्रा निघणार आहे. मनसे नेते राजपूत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा असणार आहे. 


नुकत्याच पनवेल येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना विविध प्रकारच्या आंदोलनातून मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा लावून धरण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी ही पदयात्रा असणार आहे. या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, ही पदयात्रा तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात चालत ही पदयात्रा करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात मनससेकडून गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. 


दरम्यान, यासंदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्याची दयनीय अवस्था आहे. विशेषतः मुंबई-गोवा महामार्गवर असंख्य खड्डे आहेत. या रस्त्यावर आतापर्यंत अनेक मृत्यू झाले आहेत. याबद्दल सरकार खंत व्यक्त करत नाही. सरकार गणपतीपर्यंत काम पूर्ण होणार असल्याचं फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे आम्ही ही जागर यात्रा काढणार आहोत, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. 


याचबरोबर, संदीप देशपांडे यांनी या पदयात्रेविषयी देखील माहिती दिली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव निघणार आहे. तर या यात्रेचा दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. तसेच, यावेळी कोकणातल्या लोकांनाही यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मनसेचे या जनजागृती यात्रेला लोकांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 


राज ठाकरे यांनी दिला होता इशारामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. तसेच या मुद्द्यावरुन विविध प्रकारचे आंदोलन करण्याचे आदेश सुद्धा राज ठाकरे यांनी दिले होते. राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर मनसे खड्ड्यांच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर