आमदार अनिकेत भाई तटकरे लक्षवेधी मांडताना झाले आक्रमक, भूमिगत विदयुत वाहिनी का होता नाहीत आणि भरमसाठ light बिले का येतात..म्हसळा शहरातील विदयुत वाहिन्या जमिनीखालून कराव्यात, सरोज मंगेश म्हशीळकर यांना लिहिले आमदारांना पत्र निसर्ग चक्रीवादळात 2 महिने विजपुरवठा बंद होता, तेव्हापासून भूमिगत विद्युत वाहिनी करणार असे ठरले होते मात्र पुढे काही झाले नाही?
म्हसळा शहरातील विदयुत वाहिन्या जमिनीखालून कराव्यात, सरोज मंगेश म्हशीळकर यांना लिहिले आमदारांना पत्र
निसर्ग चक्रीवादळात 2 महिने विजपुरवठा बंद होता, तेव्हापासून भूमिगत विद्युत वाहिनी करणार असे ठरले होते मात्र पुढे काही झाले नाही?
म्हसळा (जितेंद्र नटे)
म्हसळा तालुका शहर हा अत्यंत दुर्गम असा भाग आहे. एकेबाजूला नदी तर एका बाजूला डोंगराने वेढलेले हे शहर तालुका आहे. सध्या या शहराची लोकवस्ती 15 ते 20 हजाराच्या आसपास असण्याची शक्यता आहे. अनेक लोक येथे रोजगार, कामधंधा तसेच खरेदीसाठी येत असतात. यामुळे शहर तालुका अत्यंत गजबजलेले असते.
मात्र या शहरात अजूनही विदयुत वाहिन्या या उभे पोल मार्फत आहेत. अनेक वेळा पोळच्या दुर्घटना घडल्या आहेत. चक्क म्हसळा नगरपंचायत च्या इमारती जवळच पोल विदयुत वाहिनन्यांचा "झूपडा" पाहायला मिळतो आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किटचे अनेक प्रकार घडून अपघात झाले आहेत आणि पुढेंही होणार आहेत. म्हणूनच सरोज मंगेश म्हशीळकर यांना एक पत्र आमदार आदिती ताई तटकरे, आमदार अनिकेत भाई तटकरे यांना लिहून लक्ष वेधले आहे.
याच प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी पावसाळी अधिवेशनात तात्काळ लक्षवेधी मांडली आहे. शासन लवकरच याचा पाठपुरावा करेल व म्हसळा शहरातील ही समस्या कायमची सुटेल अशी आशा म्हसळेकरांनी बाळगायला काही हरकत नाही. हा विषय अत्यंत गंभीर असून लवकरच त्याचे निराकरण केले जाईल असे आमदार आदितीताई तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे.
वरील link क्लीक करा आणि पहा आमदार अनिकेत भाई तटकरे लक्षवेधी मांडताना झाले आक्रमक, भूमिगत विदयुत वाहिनी का होता नाहीत आणि भरमसाठ light बिले का येतात.
Comments
Post a Comment