राजसाहेब तुम्ही तरी काय केलेत? 17 वर्षात मुंबई-गोवा हायवेसाठी एकदा तरी जन आंदोलन छेडलेत का? 'रायगड मत' चे संपादक जितेंद्र नटे यांनी काही दिवसांपूर्वी विचारला होता तिरकस पण जबरदस्त सवाल? त्याची दखल घेत राजसाहेब पनवेल मध्ये येत आहेत.




राजसाहेब तुम्ही तरी काय केलेत? 17 वर्षात मुंबई-गोवा हायवेसाठी एकदा तरी जन आंदोलन छेडलेत का? 'रायगड मत' चे संपादक जितेंद्र नटे यांनी काही दिवसांपूर्वी विचारला होता तिरकस पण जबरदस्त सवाल? त्याची दखल घेत राजसाहेब पनवेल मध्ये येत आहेत.

पनवेल : रायगड मत राज साहेब मुंबई गोवा प्रश्नासाबंधि पनवेल मद्ये येत आहेत. 17 वर्षे कुठे होतात?

अरे बापरे इतके वर्षे कुठे होतात? आपण निर्धार मेळावा नव्हे सरळ रस्त्यावर उतरले पाहिजे अशी अपेक्षा आहे जनतेला. 


मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्ड्याना 76 वर्ष पूर्ण, 17 वर्षे कामाची बोंबाबोंब, आता राजसाहेब येत आहेत? रायगड मत चे संपादक जितेंद्र नटे यांनी याविषयी एक महिन्यापूर्वी घातली होती साद, Youtube च्यामाध्यमातून Viral केली होती विडिओ News.


राजसाहेबांनी घेतली आहे दखल म्हणूनच ते येत आहेत 16 ऑगस्टला पनवेलमध्ये. मुंबई गोवा हायवेच्या प्रश्नासंबंधी निर्धार मेळावा घेऊन.


काय म्हणाले होते जितेंद्र नटे राजसाहेबांविषयी? कसा मांडला होता विषय

पहा हा व्हिडीओ....

लाव रे तो विडिओ....


17वर्षानंतर राजासाहेब आपण आवाज उठवत आहात? त्यासाठी पनवेलमध्ये येत आहात निर्धार मेळावा घेऊन.


अरे बापरे इतके वर्षे कुठे होतात? आपण निर्धार मेळावा नव्हे सरळ रस्त्यावर उतरले पाहिजे आपण? अशी अपेक्षा आहे जनतेला!


 खड्डेच खड्डे, नेहमीच गावाला जावे तरी कसे असा प्रश्न त्यामुळे कोकणवासीयांसमोर पडतो. विशेष करून गणपती उत्सवाच्यावेळी गोवा महामार्गाची चाळन झालेली असते.


मुळात या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय अत्याचार केले गेले. कंत्राटदार हे नेते मंडळींचेच आहेत आणि ते पैसे खाऊन पळाले आहेत. चौपदरीकरण करा म्हणून आंदोलने झाली.


एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी बोंबाबोंब ही केली आंदोलनही केले. स्थानिक लोकांनाही अपघात होतात म्हणून चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी आंदोलने करण्यास उद्युक्त केले गेले. ते सर्व विचारात घेता चौपदरीकरण हा बनाव होता का, असाच प्रश्न आता पडतो. 17 वर्षांपासून रखडत पडलेल्या या चौपदरीकरणाच्या कामालाही नीट रूप दिलेले नाही. कोकणाचा भौगोलिक ढाचाच अनेक ठिकाणी विचारात घेतलेला नाही.


पनवेल ते वडखळ नाका या दरम्यान झालेला मार्गही सध्या चांगल्या स्थितीत नाही. तो रस्ताही नीट नाही, वडखळ नाका ते इंदापूर या दरम्यानचा मार्गही चंद्रावरील खड्ड्यांचा बनला आहे. 


मुळात कोकणात जाण्यासाठी नेमके काय करायला हवे होते, त्याचा एक कच्चा आराखडा नियोजनकारांनी दाखवला होता? मात्र कोणीही वाली नसलेला मुंबई गोवा हायवेसाठी येत आहात त्याबद्द्दल आपले धन्यवाद व आभार आता तरी सरकार जागे होईल यात शंका नाही. मात्र तुम्ही मुद्दा लावून धराल हीच. संबंध कोकणवासियांना अपेक्षा. ही अपेक्षा भंग होऊ देऊ नका. हीच विनंती 🙏


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर