रायगड जिल्ह्यासाठी एकूण 1,10,00,00,616.09 रुपये मंजूर - अदिती तटकरे
मग एवढा पैसा जातो कुठे? जनतेला नेहमी पडणारा प्रश्न? 🫢
#आपत्ती विभाग रायगड जिल्ह्यासाठी 1 हजार 10 कोटी रुपये.
#जून 2023 अखेर झालेल्या 187.77 कोटीच्या खर्चास तसेच 68.32 कोटी रकमेच्या पूनर्विनियोजनास मान्यता.
# 2023-24 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी अर्थसंकल्पिय तरतूद 360.00 कोटी रुपये.
रायगड मत विशेष बातमी
अलिबाग येथे पालकमंत्री मा.ना.उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थित राहिले.यावेळी खा.श्री.सुनिल तटकरे साहेब, आ.श्री.जयंतभाई पाटील, आ.श्री.अनिकेत तटकरे,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे,आ.श्री.रविंद्र पाटील, आ.श्री.भरत गोगावले,आ.श्री.प्रशांत ठाकूर, आ.श्री.महेंद्र दळवी,आ.महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी,पनवेल महानगरपालिका आयुक्त,जिल्हा नियोजन अधिकारी तसेच शासकीय विभागांचे विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बैठकीत रायगड जिल्हा वार्षिक योजना 2022-23 या आर्थिक वर्षातील जून 2023 अखेर झालेल्या 187.77 कोटीच्या खर्चास तसेच 68.32 कोटी रकमेच्या पूनर्विनियोजनास मान्यता देण्यात आली.तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी अर्थसंकल्पिय तरतूद 360.00 कोटी,अनुसूचित जाती उपयोजना,आदिवासी उपयोजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे.
यावेळी भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांच्या भाडयाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे सांगितले. इर्शाळवाडी दुघर्टनेमध्ये जिल्हा प्रशासनाबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था तसेच ग्रुप यांनी बचाव कार्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना आभाराचे पत्र देण्याच्या सूचना केल्या.जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर तसेच राज्य महामार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याची कार्यवाही संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी विहित मुदतीत पूर्ण करावी. मुदतीनंतर खड्यांमुळे एखाद्या नागरिकांचा मृत्यू झाल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
कोकण विभागातील आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पासाठी 3 हजार 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये रायगड जिल्ह्यासाठी 1 हजार 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये धूपप्रतिबंधक बंधारे, दरडप्रतिबंधक कामे तसेच बहुउद्देशीय निवारा केंद्र, भूमिगत विद्युत वाहिनी इत्यादी कामे प्रस्तावित करण्यात आली.
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त वाडीचे कायमस्वरुपी पुनर्वसन येत्या सहा महिन्यात सिडकोमार्फत शासकीय जमिनीवर कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय व जि.प इमारतीसाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निर्देशविविध विषयांवर चर्चा करून निर्देश देण्यात आले.
अनेक लोकांना हाच प्रश्न पडतो कि एवढा पैसा खर्च केला जातो तर मग रोजगार निर्मित का नाही. पर्यटन रोजगार का वाढत नाही. लोक अजूनही मुबईला नोकरी करण्यासाठी येत असून गावीच्या गावे ही रायगड जिल्ह्यातील ओस पडत चालली आहेत. 80टक्के लोकांनी शेती टाकली आहे. आणी शहराकडे नोकरीं धंधा करीत आहेत. मराठी माध्यमात शिकवून पुढे मुलांना नोकरी मिळविण्यास अडचण होणार म्हणून अनेक लोक शहराकडे इंग्लिश मेडीयममध्ये शिकायला टाकत आहेत.
हे सर्व दुर्दैवी आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. मुबंईपासून हाकेच्या अंतरावर रायगड आहे मात्र अजूनही हायवे चे काम 15 वर्षे अपूर्णच आहे. याला जबादार जनताच आहे. इथली जनताच थंड आहे.
Comments
Post a Comment