म्हसळा महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने पाँवर पाँइट प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन
म्हसळा महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने पाँवर पाँइट प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन
म्हसळा : रायगड मत
म्हसळा येथील वसंतराव नाईक कला,वाणिज्य आणि बँरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणक्रम पुर्ण करताना जागतिक स्तरावरील गंभीर स्वरूप धारण करणा-या समस्याची जाणीव व्हावी तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या युगात दृकश्राव्य तंत्रज्ञानाच्या साह्याने सादरीकरण कौशल्य आत्मसात करता यावे या उद्देशाने अर्थशास्त्र विभागातर्फे आणि मा.श्री. मुश्ताक साहेब अंतुले, मा.श्री.अशोक तळवटकर साहेब मा.श्री. फजलसाहेब हळदे,मा.श्री.महादेव पाटील साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य दिगंबर टेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात " पाँवर पाँइट प्रेझेंटेशन स्पर्धा "आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील १८विद्यार्थी विद्यार्थीनीनी सहभाग घेतला आणि जागतिक लोकसंख्येचे गंभीर स्वरूप दर्शवणा-या पोस्टरच्या माध्यमातून लोकसंख्या वाढीचे चांगले आणि वाईट परिणाम स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला स्पर्धेमध्ये कु.साक्षी आंजार्लेकर , कु.मेदांडकर ,कु.आयेशा साईबोले,कु.पठाण कु.जुवेरा नजीरी, कु.काठेवाडी या विद्यार्थीनीनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले स्पर्धेचे परीक्षक म्हणुन महाविद्यालयातील वनस्पती शास्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. सौ.नजीरी सलमा आणि अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.शिरीष समेळ यांनी काम पाहिले महाविद्यालयात एका अनोख्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल महाविद्यालय विकास समिती सर्व सदस्य ,प्रभारी प्राचार्य आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले
Comments
Post a Comment