आदिती तटकरे यांनी घेतली रुग्णालयात जाऊन काळजी, इर्शाल वाडीतील जखमींची केली काळजीपूर्वक विचारपूस
आदिती तटकरे यांनी घेतली रुग्णालयात जाऊन काळजी,
इर्शाल वाडीतील जखमींची केली काळजीपूर्वक विचारपूस
रायगड मत :
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगड पायथ्याशी मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली येथील इर्शाळवाडी वर मोठी दरड कोसळली या दुर्घटनेत काही नागरिक सुखरूप वाचले आहेत काही अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत तर अनेकजण मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यावेळी जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी एमजीएम रुग्णालयात, कळंबोली, पनवेल येथे दाखल करण्यात आले यावेळी या प्रसंगी जखमींची रूग्णालयात भेट घेवून त्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
तसेच यावेळी सतत प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेत वेळोवेळी सूचना देऊन मदत कार्यात गती देत आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त स्थळी विविध शासकीय अधिकारी,पोलीस यंत्रणा, एनडीआरएफ टीम बरोबरच दुर्घटना स्थळाच्या जवळच्या संस्था, यंत्रणा व साहित्य त्यांनी मदत करण्यात सहभागी करून घेतले. ज्यामुळे शासकीय यंत्रणेसह अनेक स्वयंसेवी संस्था घटनास्थळी पोहोचून बचाव व मदत कार्य सुरू झाले आहे. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
Comments
Post a Comment