कर्तव्य काळ' निमित्ताने वृक्षारोपण मोहिम; प्रधान सचिवांची लाभली प्रमुख उपस्थिती

 

 'कर्तव्य काळनिमित्ताने वृक्षारोपण मोहिम; प्रधान सचिवांची लाभली प्रमुख उपस्थिती


 

 

पनवेल(प्रतिनिधी) भारतातील एक सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी टाटा पॉवरने हरित व पर्यावरणपूरक भविष्य निर्मितीसाठी योगदान देण्याचे प्रयत्न सुरु ठेवतआपल्या वालवन धरणाच्या परिसरात महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी वृक्षारोपण मोहिमेची सुविधा उपलब्ध करून दिली. महाराष्ट्र शासनाचे वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डीपीसीसीएफ आणि वन दलाचे प्रमुख वायएलपी राव यांच्या नेतृत्वाखालीटाटा पॉवरचे हायड्रोजचे चीफ प्रभाकर काळेडब्ल्यूआरईएलचे सीईओ ए जी पाटील आणि इतर वरिष्ठांच्या उपस्थितीत 'टाटा अमृतवन'मध्ये ४०० पेक्षा जास्त रोपांची लागवड करण्यात आली.

  निसर्ग संवर्धनाप्रती आपल्या जबाबदारीचे पालन करत टाटा पॉवरने स्वातंत्र्याच्या पुढील २५ वर्षांमध्ये आपल्या कर्तव्यांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या भारताच्या धोरणाला अनुसरूनकर्तव्य काळच्या निमित्ताने या उपक्रमात सहयोग प्रदान केला आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून टाटा पॉवरने वालवनमध्ये एक व्यापक वृक्षारोपण कार्यक्रम चालवत आहे. १९७० च्या दशकात सुरु करण्यात आलेल्या माहसीर संवर्धन प्रकल्पाबरोबरीनेच हिरवाईमध्ये वाढ करण्यासाठी व स्थानिक वनस्पती व वन्यजीवांच्या संवर्धनाला पाठिंबा देण्यासाठी टाटा पॉवरने हा उपक्रम सुरु केला. जमिनीची धूप होण्यापासून रोखणेजवळपासच्या समुदायांसाठी रोजगार निर्मिती करणे तसेच शैक्षणिक व बौद्धिक उद्देशांसाठी माहिती जमा करणेडॉक्युमेंटेशन करणे ही या उपक्रमाची उद्दिष्ट्ये आहेत. गेल्या वर्षी वनीकरणावर भर देत संपूर्ण पश्चिम घाट भागात दहा लाखांपेक्षा जास्त रोपांची लागवड करण्यात आली.    

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर