वाढते प्रदूषण




वाढते प्रदूषण*

 लेखक- श्री. अण्णासाहेब संदिपान बिचुकले रायगड जिल्हा परिषद शाळा खारगाव बुद्रुक, तालुका- मसळा, जिल्हा- रायगड 

देशाच्या भवितव्याचा दुर्गामी विचार केला तर वाढते प्रदूषण ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. वायु प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषण या तिन्ही प्रदूषणामुळे आपले संपूर्ण वातावरण दूषित झाले आहे. श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा मिळेना, पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेना तर कानावर येणारा कर्कश्य आवाजामुळे कानाच्या संबंधित गंभीर समस्या उद्भवत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ-मोठे उद्योगधंदे उभारले जात आहेत. जंगले तोडून त्या ठिकाणी इमारती कारखाने उभारले जात आहेत परंतु याचा परिणाम प्रदूषणामध्ये दिसून येत आहेत. प्रदूषणामुळे स्वच्छ पाणी प्यायला मिळत नसल्याने अनेक रोगाला आमंत्रण मिळत आहे. आजच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या शहरांचा आणि महानगर यांचा विस्तार खूप झपाट्याने होत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात वापरली जाणारी वाहने मोटरसायकल, बसेस, रिक्षा यामुळे वायू प्रदूषणाचा सामना करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. विकसित झालेल्या शहर आणि महानगरांमध्ये औद्योगीकरणासाठी झपाट आणि वाढ झालेली आहे आणि याचा परिणाम म्हणजे संपूर्ण निसर्ग असंतुलित झाला आहे. कारखान्याच्या धुराड्यातून रुग्णाला कार्बन डायऑक्साइड वायू वातावरणातील ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमी करतो त्यामुळे माणसाला श्वास घेताना त्रास होत आहे. यातून शोषणाचे आजार यासारखे गंभीर आजारांचे संभावना अगदीच वाढली आहे. बऱ्याचदा दूषित हवेमध्ये श्वास घेतल्यात हृदयाचे झटके देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दोन्ही प्रदूषण हे देखील जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण याप्रमाणेच घातक ठरत आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये वाहनांचे हॉर्न, कारखान्याचे भोंगे, सण समारंभात वाजवले जाणारे ताशा, डीजे कर्कश आवाज इत्यादी सर्व कारणांमुळे ध्वनी प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. आपल्या कानाला आवश्यकतेपेक्षा जास्त आवाज पडल्यास बहिरेपणा आणि कानाच्या संबंधित इतर आजार उद्भवत आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषण देखील मानवी आरोग्यासाठी खूप घातक, हानिकारक आहे. भारतात प्रदूषण वेगाने वाढत असून दिल्ली ही आघाडीवर आहे. अन्य शहरातही प्रदूषणाचे लोन पसरत आहे जगभरात जवळपास 15% मृत्यू प्रदूषणामुळे होतात, असे ग्लोबल अलायन्स ऑन हेल्थ अँड पोल्युशन(जीएएचपी) या संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. 400 संस्था आणि 40 देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली( जीएएचपी) संस्थेत आरोग्य आणि प्रदूषणासंदर्भात अभ्यास केला जातो. भारतासह चीनमध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अधिक आहे. असे जीएएचपी च्या अहवालात सांगण्यात आले आहे. प्रदूषणामुळे गेल्या काही वर्षात 83 लाख लोकांचा मृत्यू झाला. यापैकी 23 लाख भारतीय आहेत भारता पाठोपाठ चीनचा (18 लाख) क्रमांक लागतो. नायजेरिया( 2.71 लाख) तसेच इंडोनेशिया आणि पाकिस्तान मध्ये अनुक्रमे( 2.32 लाख) आणि (2.23 लाख) मृत्यूची नोंद झाली. अमेरिकेत प्रदूषणामुळे दोन लाख दगावले आहेत. यावरून जगभरात पसरलेल्या प्रदूषणाच्या समस्येची तीव्रता प्रकर्षाने जाणवते. (जीएएचपी) संस्थेच्या अहवालानुसार जगात प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी तब्बल दोन तृतीयांश मृत्यू केवळ दहा देशांमध्ये होतात. या यादीत बांगलादेश, रशिया,इथिवोपिया आणि ब्राझील या देशांचा देखील समावेश आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या 34 लाख (40%) अचानक आणि अकाली मृत्यूचे कारण वाहने आणि उद्योगामुळे निर्माण होणारे प्रदूषण आहे. या आकडेवारीचा स्वतंत्रपणे अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, चीनमधील झालेल्या मृत्यूचे प्रमाण 12.42 लाख असून भारतात हा आकडा 12.40 लाख इतका आहे. प्रदूषणाची समस्या डोळ्यासमोर ठेवून, चीनने प्रदूषण करणाऱ्या संस्था आणि उद्योगांविरोधात कडक उपयोजना केल्या. यामुळे गेल्या दहा वर्षात तिथे प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. भारतात याविरुद्ध परिस्थिती असून, यादरम्यान देशात प्रदूषणाच्या कारणामुळे अचानक होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 23% ने वाढले आहे. याची कारण म्हणजे प्रदूषण नियंत्रणाबाबत पुरेशा उपयोजनांचा अभाव हे स्पष्ट झाले आहे. देशात होणाऱ्या आठ मृत्यूनपैकी एक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतो. त्याचप्रमाणे, प्रदूषित हवेमुळे नागरिकांचे आयुर्मान 1.7 वर्षांनी कमी झाले आहे, अशी माहिती इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च च्या (आयसीएमआर) अहवालातून गेल्या वर्षी समोर आली होती. एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा याचे गांभीर्य कोणी घेताना दिसत नाही. म्हणून प्रदूषण रोखणे ही काळाची गरज बनली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आपण वृक्षतोड थांबवलीपाहिजे, वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केले पाहिजे. तसेच खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात करायला हवा. आवश्यकतेपेक्षा जास्त मोठा आवाज कोठे ऐकायला येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांवर संपूर्ण बंदी आणणे. एकंदरीत भारत सरकारने प्रदूषण निर्माण करणाऱ्या स्त्रोतांना आळा घालण्याचा विकास अजेंडा राबवला आणि प्रदूषणाविरोधात सामाजिक चळवळ उभी केली, तर भारतातील हवामान देखील असे शुद्ध होऊ शकते. एवढे मात्र खरे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर