गाढेश्वर धरणात वाहून जाणाऱ्या दोघांसाठी पनवेल तालुका पोलिस ठरले देवदूत

https://youtu.be/T75z3_uCmL0

पनवेल पोलीस ठरले देवदूत वाचवले प्राण गाढेश्वर धरणात वाहून जाणाऱ्या दोघांसाठी पनवेल तालुका पोलिस ठरले देवदूत

पनवेल  (वार्ताहर) :


गाढेश्वर धरणाच्या परिसरात पोहण्यास गेलेल्या व पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहत चाललेल्या दोघांसाठी पनवेल तालुका पोलीस देवदूत ठरले असून पनवेल तालुका पोलिसांनी प्रसंगावधान राखत मृत्यूच्या दाढेतून या दोघांना सुखरूप बाहेर काढले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे. 

           पनवेल तालुक्यातील गाढेश्वर (देहरंग) धरणाच्या परिसरात पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात मजा लुटण्यासाठी पर्यटकांच्या झुंडी शनिवार व रविवारी येत असतात. अतिउत्साहामुळे काही पर्यटक खोल पाण्यात उतरतात. त्यामुळे गाढेश्वर धरणाकडे जाण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मात्र, तरीदेखील काही उत्साही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून धरणाकडे जातात. पनवेल तालुका पोलिस ठाणे हद्दीतील नेरे बीटमध्ये पोलिस गस्त घालत असताना गाढेश्वर नदीपात्रात सोहेल खावजौद्दिन अहमद शेख व मनोज शंकर गांगुर्डे हे दोघेजण पाण्याच्या जोरदार प्रवाहातवाहत जाऊन पाण्यात अडकल्याचे पोलिसांना दिसले. सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद फडतरे, तुकाराम कोरडे, संदीप पाटील, धनंजय पठारे, कांबळे, जाधव यांनी तत्काळ दोरीच्या साहाय्याने या दोघांना सुखरूप बाहेर काढले. तसेच यावेळी पोलिसांनी अतिउत्साह टाळण्याचे आणि सतर्कतेचे आव्हान केले आहे.

कोट - पर्यटकांनी वर्षासहलीसाठी येताना त्या भागातली पूर्ण माहिती घ्यावी तसेच विविध पर्यटनस्थळी पोलिसांनी सूचनाफलक लावले आहेत. त्या सूचनांचे योग्य पालन करावे - अनिल पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)

फोटो : धरणात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवताना पनवेल तालुका पोलीस

https://youtu.be/T75z3_uCmL0

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर