गार्डन हॉटेल जवळ झाड पडले उन्मळून




गार्डन हॉटेल जवळ झाड पडले उन्मळून

पनवेल  (वार्ताहर) : पनवेल शहरातील पायोनीअर विभाग येथील गार्डन हॉटेल जवळ अनेक वर्षे जुने झाड अचानक उन्मळून विद्युत वाहिनीवर पडले. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन जयराम पाटील, सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते, प्रसाद कंधारे, विनीत मढवी, महेश सरदेसाई, सचिन नाझरे यांनी सदर स्थळी जाऊन झाड हटवण्यासाठी मदत कार्य केले.

गार्डन हॉटेल वरून येणारा स्वामी नित्यानंद मार्ग मुख्य रस्त्यामध्ये मोडत असल्याने यावर कायम रहदारी असते. त्यामुळे पालिका कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी पाटील आणि त्यांचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले तर वाहतूक पोलीस उपनिरीक्षक गणेश खांडेकर यांच्या सहयोगाने रस्ता वाहतुकीसाठी लवकर मोकळा करण्यात आला.

फोटो : गार्डन हॉटेल जवळ झाड पडले उन्मळून

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर