राज्यकर व वस्तु सेवा कर विभाग उपायुक्त श्री दत्तात्रय फुलसुंदर सेवानिवृत्त .
राज्यकर व वस्तु सेवा कर विभाग उपायुक्त श्री दत्तात्रय फुलसुंदर सेवानिवृत्त .
मुबंई :
महाराष्ट्र शासन राज्यकर (वस्तू आणि सेवाकर विभाग ) मुंबई माझगाव येथील कार्यक्षम व मनमिळाऊ स्वभावाचे अधिकारी श्री दत्तात्रय फुलसुंदर हे दिनांक 30 जून 2023 रोजी आपल्या 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले अतिशय मनमिळावू मेहनती अधिकारी आणि क्रिडा प्रेमी म्हणून त्यांचा नावलौकिक होता 19 92 साली तत्कालीन महाराष्ट्र विक्रीकर विभाग मध्ये ते विक्रीकर निरीक्षक म्हणून नियुक्त झाले तर नंतर विक्रीकर अधिकारी, सहाय्यक विक्रीकर आयुक्त ,आणि तदनतर त्यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली .पुणे जिल्ह्यातील शिवभूमी जुन्नर तालुका. या तालुक्यातील वडगाव कांदळी हे त्यांचे जन्मगाव महाविद्यालयीन शिक्षण "ओतूर"आणि पुणे येथे पूर्ण करून त्यांनी शासन सेवेत प्रवेश केला बीकॉम आणि एम एस डब्ल्यू म्हणजेच मास्टर ऑफ सोशल वर्क ही पदवी त्यांनी प्राप्त केली होती .विक्रीकर कायदा नंतर मुल्यावर्धीत(VAT) कर कायदा आला आणि त्यानंतर आता GST महणजेच वस्तू व सेवा कर कायदा आला.त्या प्रत्येक वेळी दत्तात्रय फुलसुंदर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडली.त्यामुळे त्यांना शाशंक माथने,सुभाष एगडे,राजश्री नाड गौडा,मनीषा पाटणकर(IAS),
उमाळे साहेब,प्रसाद जोशी अशा मान्यवर अधिकाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.याबाबत ते स्व:
ताला भाग्यवान मानतात.एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले दत्तात्रय फुलसुंदर यांचां मुलगा डॉक्टर प्रथमेश फुलसुदर हा BDS आणि MDS पदवी धारक आहे आणि तो दतंवैधक महणुंन पुणे येथे कार्यरत आहे.तसेच पत्नी सौ.वैशाली डी.फुलसुंदर या मंत्रालया मध्ये "अवर सचिव,ओबीसी, बहुजन विकास विभाग येथे कार्यरत असून मुलगी डॉक्टर आदिती ही MBBS चे पदवी चे शेवट चे वर्षाचे प्रशिक्षण"रशिया"मध्ये घेत आहेत.
कबड्डी, खोखो,कुस्ती या देशी खेळा सोबत त्यांना वेट्टलिफ्टीग आणि पॉवरलिफ्टिंग या खेळांची आवड होती. श्री दत्तात्रेय फुलसुंदर यांनी पॉवरलिफ्टिंग रायगडचे अरुण पाटकर यांना सराव आणि स्पर्धासाठी खूप मोलाचे सहकार्य केलेले आहे. महणुंनच पॉवरलिफ्टींग खेळ आणि संघटना या साठी योग्य कार्य करू शकले.
महणून त्यांचे अधिपत्याखालील खूप वेळा काम केलेले सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षक अरुण पाटकर यांनी श्री फुलसुंदर याचे सेवानिवृत्ती दिवशी व्यक्तिशः जाऊन "पॉवरलिफ्टिग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड"
चे वतीने भेटवस्तू देऊन त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी तेथे राज्यकर अधिकारी
राजेंद्र बारकु शिंदे साहेब, राज्य युनियन चे माजी पदाधिकारी दशरथ बोरकर साहेब,काळोखे साहेब आणि
पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे खजिनदार राहुल गजरमल होते.
Comments
Post a Comment