*नवी मुंबई सामाजिक, शैक्षणिक संस्था समन्वय समितीची बैठक खारघर येथे संपन्न*
*नवी मुंबई सामाजिक, शैक्षणिक संस्था समन्वय समितीची बैठक खारघर येथे संपन्न*
पनवेल दि. १७ ( वार्ताहर ) : नवी मुंबई सामाजिक, शैक्षणिक संस्था समन्वय समितीची बैठक शांताबाई रामराव सभ ग्रह, सत्याग्रह महाविद्यालय खारघर, येथे डॉ. जी. के. डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
बैठकीला पनवेल - उरण - नवी मुंबई विभागातील कार्य आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक आणि शैक्षणिक, संस्थांचे 51 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. विशेषतः सुभाष गायकवाड, महेश साळुंके, विजय गायकवाड, चंद्रकांत जाधव, अॅड. सुशिल महाडिक, अँड. हर्षल शाक्य, एन. एम. वाघमारे, राज सदावर्ते, पी. एल. गायकवाड, एम. एल. सुर्यवंशी, सुंदर वसावे, गोविंद बनसोडे, जीवन जोशी, अनिल मुळे , किशोर शिंदे-पाटील, बळीराम मोरे, चंद्रसेन कांबळे हे उपस्थित होते. यावेळी नव्या शैक्षणिक धोरणाची भारतीय समाजावर होणारे बरे-वाईट परिणाम आणि विशेषता आंबेडकरी समाजाचे शैक्षगिक भवितव्य याबाबत सांगोपांग चर्चा होऊन सामान्यातील सामान्य माणसाला नव्या शिक्षण धोरणाची जागृती व्हावी यासाठी शिक्षण परिषद् घेण्याच्या हेतूने ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अखिल भारतीय शिक्षण परिषद घेण्याचे ठरले. सप्टेंबर 2023 मध्ये देशातील शिक्षण क्षेत्रातील आंबेडकर चळवळीतील विचारवंतांच नव्या शिक्षण धोरणावर चर्चासत्र घेण्याचे ठरले तसेच या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी शिक्षण परिषदेचे निमंत्रक म्हणून काम करण्यास, बैठकील सहमती दिली व पुढील बैठक २२ जुलै रोजी घेण्याचे ठरले .
फोटो - समन्वय समितीची बैठक
Comments
Post a Comment