रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी डॉ. जय भंडारकर
रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी डॉ. जय भंडारकर
पनवेलरोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी डॉ. जय भंडारकर ( वार्ताहर ) : सामाजिक शैक्षणिक कार्यात सदैव आघाडीवर असणार्या रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण सोहळा नुकताच प्रमुख पाहुणे भावी प्रांतपाल शितल शहा आणि पनवेलचे भाग्यविधाते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत काकाजीनी वाडी- पनवेल येथे मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या नयनरम्य सोहळ्यास विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष डिस्ट्रिक्ट ऑफीसर्स, समाजातील प्रतिष्ठित नागरिक आदि मान्यवरांसह रोटेरियन्स, अॅन्स आणि रोटरॅक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटरीच्या प्रथेप्रमाणे राष्ट्रगीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. माजी सचिव हितेश राजपुत यांनी गतवर्षात केलेल्या उल्लेखनीय कामकाजाचा लेखाजोखा मांडला. माजी अध्यक्ष कल्पेश परमार यांनी गतवर्षातील उल्लेखनीय घटना विषद केल्या. श्याम फडणवीस यांनी प्रांतपाल मंजू फडके यांचा संदेश वाचून दाखवला. नूतन अध्यक्ष डॉ. जय भंडारकर यांनी आपली सन 2023-2024 ची नूतन कार्यकारिणी जाहीर केली. प्रमुख पाहुणे भावी प्रांतपाल शितल शहा आणि प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रोटरीची पिन लावून नूतन कार्यकारिणीला सन्मानित केले. याप्रसंगी शुभदा भगत यांनी संपादित केलेल्या ‘विश्वचक्र’ या बुलेटिनचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉक्टर दिन आणि सी.ए. दिनाचे औचित्य साधून सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या डॉक्टरांचा आणि वकिलांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.नूतन अध्यक्ष डॉ. जय भंडारकर यांनी पुढील वर्षात करावयाच्या उल्लेखनीय उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. सर्वांच्या सहकार्याने आपण नुतन वर्ष संस्मरणीय करुया असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आपल्या भाषणात प्रमुख पाहुणे भावी प्रांतपाल शितल शहा यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. रोटरीची तत्वे विषद करुन नूतन वर्षात रोटरीच्या माध्यमातून भरीव काम करुया असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सन्माननीय अतिथी पनवेलचे भाग्यविधाते आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात रोटरीच्या माध्यमातून होत असलेल्या प्रचंड कामाबद्दल समाधान व्यक्त करुन मला रोटेरियन असल्याचा विशेष अभिमान वाटत असल्याचे सुतोवाच केले.सचिव ऋग्वेद कांडपिळे यांनी सेक्रेटरी अनाउन्समेंट केली.
भावी अध्यक्ष चारुदत्त भगत यांनी सदर सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणार्यांचे तसेच प्रमुख पाहुण्यांचे आणि उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. यावेळी नुतन कार्यकारिणी अध्यक्ष - डॉ. जयकुमार भंडारकर, सचिव - ऋग्वेद कांडपिळे,खजिनदार - मधुसुदन मालपाणी, आयटी ऑफीसर - तुषार तटकरी,आयपीपी व चेअरमन मुकबधिर शाळा- आयपीपी कल्पेश परमार,भावी अध्यक्ष व चेअरमन फंडरेझिंग-चारुदत्त भगत,अध्यक्ष नॉमीनी सारजंट अॅट आर्म्स व डायरेक्टर स्पोर्टस् - निलेश पोटे,उपाध्यक्ष व चेअरमन स्पोर्टस् - पीपी गुरुदेवसिंग कोहली,डायरेक्टर क्लब अॅडमिनिस्ट्रेशन - विनोद गुर्मे, आरसीपीआयटी ट्रस्ट चेअरमन व चेअरमन रोटरी फाऊंडेशन - पीपी अरविंद सावळेकर, डायरेक्टर मेंबरशीप - पीपी डॉ. प्रमोद गांधी, डायरेक्टर सर्व्हिस प्रोेजेक्ट मेडिकल - डॉ. सुरेश कारंडे, डायरेक्टर- सर्व्हिस प्रोजेक्ट नॉन मेडिकल - माधुरी श्रीनिवास कोडूरु,डायरेक्टर सिनर्जी, चेअरमन अटेंडन्स - जितेंद्र बालड,डायरेक्टर पब्लिक इमेज, ट्रस्ट सचिव - पीपी प्रमोद वालेकर,डायरेक्टर न्यु जनरेशन व चेअरमन सर्व्हिस प्रोजेक्ट नॉन मेडिकल -अॅड.दिपाली बोहरा,डायरेक्टर रोटरी फाऊंडेशन क्लब लर्निंग फॅसिलेटर - पीपी विष्णू सी. म्हात्रे,डायरेक्टर एन्व्हायरमेंट - निलम नेरकर,डायरेक्टर व्होकेशनल - विजय मेढेकर, बुलेटीन संपादक - शुभदा भगत,चेअरमन- सोशल इव्हेन्ट - संजय जैन,चेअरमन - फेलोशीप - संतोष अस्वले चेअरमन -मेडिकल प्रोजेक्ट - डॉ. किशोर सोलंकी,चेअरमन - ग्लोबल ग्रँट व सीएसआर - पीपी प्रकाश श्रृंगारपुरे,चेअरमन लिट्रसी - प्रकाश पाटील, चेअरमन मेंबर्स रिटेंशन- पीपी अलीअसगर व्होरा, परमनंट इनव्हायटी - आमदार प्रशांत ठाकूर आदींना समाविष्ट करण्यात आले आहे .
फोटो - रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी डॉ. जय भंडारकर
Comments
Post a Comment