पनवेल मधील उद्यानांची दुरावस्था, "प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी"

 


पनवेल मधील उद्यानांची दुरावस्था, "प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी"


नवीन पनवेल : पनवेल महानगरपालिकेने सिडकोच्या विभागातील गार्डन हस्तांतरित करून घेतले आहेत. उन्हाळ्यामध्ये तिथे बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यानेच अनेक उद्यानांची वाताहात होती. आता पावसाळा सुरू झाला आहे सदर परिस्थितीत आयुक्तांनी पाहणी करून नव्याने वृक्षारोपण आणि इतर व्यवस्था पूर्ववत होईल याची दक्षता घ्यावी असे प्रितम म्हात्रे यांनी सुचवले आहे.


         सुरक्षेच्या दृष्टीने नवीन पनवेल सेक्टर 3 येथील गार्डन मध्ये रात्री दारु पिण्याचे प्रकार अंधाराचा फायदा घेऊन वाढत आहेत त्यानंतर त्या बाटल्या तशाच फेकुन द्यायच्या. परिसरातील फूटपाथवर मातीचा ढिग तसेच रेबिट ठेवले आहे त्यामुळे चालायचा प्रश्न निर्माण होत आहे. गार्डनमध्ये रात्रीच्या वेळी दिवे सुरू नसतात. अंधाराचा फायदा घेऊन भविष्यात काही दुर्घटना घडू नये यासाठी सुरक्षारक्षक 24 तास नेमण्यात यावा. त्वरित लाईट व्यवस्था सुरू करण्यात यावी. तेथील सुविधांच्या बाबतीत अशा प्रकारची सध्य परिस्थिती त्यांनी आयुक्तांसमोर माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी पत्राद्वारे मांडली. या सर्व गोष्टी गांभीर्याने पाहून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व उद्यानांची पाहणी करून नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी उद्याने सुस्थितीत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


      


चौकट


सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या उद्यानांच्या बाबतीत अशा प्रकारची परिस्थिती बऱ्याचशा महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानांमध्ये सध्या आहे. आयुक्तांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना करावी अशाप्रकारे मागणी मी केली आहे आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा यापुढे घेईन. -प्रितम जनार्दन म्हात्रे,(माजी विरोधी पक्षनेता),पनवेल महानगरपालिका


 



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर