शेकापचे विलास फडके यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी संपन्न
शेकापचे विलास फडके यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी संपन्न
पनवेल : रायगड जिल्हा परिषदेचे विहिघर येथील माजी सदस्य विलास नारायण फडके यांचा वाढदिवस 15 जुलै व 16 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकाउपयुक्त विविध उपक्रमांद्वारे परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
माजी सभापती काशिनाथ पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचा सर्वात लाडका कार्यकर्ता विलास फडके असल्याचे सांगितले तर माजी आमदार बाळाराम पाटील यांनी विलास फडके यांनी ठेवलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. 15 जुलै रोजी करुणेश्वर वृद्धाश्रम भानघर, स्नेह कुंज आधारगृह वृद्धाश्रम नेरे तसेच शील आश्रम वांगणी येथे अन्नदान करण्यात आले. नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप, मोफत छत्री वाटप, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मोफत गणेश वाटप व शासन आपल्या दारी योजना राबवण्यात आल्या. याचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. राजीप शाळा विहिघर सभागृह सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. तर 16 जुलै रोजी ग्रुप ग्रामपंचायत चिपळे हद्दीतील भोकरपाडा, बोनशेत, चिपळे, कोप्रोली येथे वृक्षारोपण करण्यात आले. विहिघर येथे बोरवेल ते स्मशानभूमी पाईपलाईन व पाण्याची टाकी उद्घाटन, तलाव नूतनीकरण व सुशोभीकरणाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे माजी सभापती काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, नामदेव शेठ फडके ,अनिल फडके, महेंद्र भगत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment