म्हसळ्यात पेटलं सुडाचं राजकारण... # भ्रष्टाचारा विरोधात आवाज उचलणारा पत्रकार सुडाच्या राजकारणाचा बळी...
म्हसळ्यात पेटलं सुडाचं राजकारण...
भ्रष्टाचारा विरोधात आवाज उचलणारा पत्रकार सुडाच्या राजकारणाचा बळी...
म्हसळा (मुदस्सिर पटेल)
मागील काही वर्षापासून म्हसळा तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायती मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते व कोकण 24 न्यूज चे मुख्य संपादक अझहर धनसे यांनी या पांगळोली ग्रामपंचायती च्या भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठविला होता व तशी तक्रार त्यांनी कोकण अयुकतां कडे केली होती व कोकण आयुक्तांनी अझहर धनसे यांनी केलेल्या तक्रारीबाबत चौकशी करून माननीय कोकण अयुक्तांनी पांगळोली सरपंच तसेच पांगळोली गांव चे ग्राम विकास अधिकारी गणपती केसरकर यांना भ्रष्टाचारात दोषी मानून पांगळोली ग्रामपंचायती मध्ये ६० लाख एक हजार 16 रुपयांचा अपहार झाला असल्याचा निर्णय देत पांगळोली सरपंच तसेच ग्राम विकास अधिकारी यांच्या कडून सदर ची रककम वसूल करण्याचे आदेश व केलेल्या भ्रष्टाचारा बाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश माननीय कोकण आयुक्तांनी दिले होते मात्र कारवाई न करता म्हसळा गटविकास अधिकारी यांनी कोकण आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याने सध्या म्हसळा तालुक्यात या विषयाचा चांगलाच गाजावाजा आहे दिनांक 24 जुलाई 2023 रोजी पांगळोली ग्रामपंचायत येथे प्रशासकांच्या माध्यमातून विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेले ग्राम विकास अधिकारी गणपती केसरकर हे या ग्रामसभेला उपस्थित असल्याने ज्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप माननीय कोकण आयुक्तांनी दोषी मानत सिद्ध केलेले आहेत असा ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायती मध्ये अजून कार्यरत कसे.? असा प्रश्न पांगळोली गावातील काही ग्रामस्थ तसेच कोकण 24 न्यूज चे मुख्य संपादक अझहर धनसे यांनी या ग्राम सभेत उपस्थित केला होता व सदर ग्रामसभा तहकूब करण्यात आली मात्र पूर्वी आपल्या वर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ग्रामविकास अधिकारी गणपती केसरकर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात पत्रकार अझहर धनसे व त्यांचा भाऊ मुजाहीद धनसे यांच्या विरोधात कलम 353, 500 , 504 , 506 प्रमाणे म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून केलेल्या भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठविणाऱ्यानांच दोषी ठरवत आपली पोळी भाजली . म्हसळा पोलीसांनी तक्रार दाखल झाल्या नंतर पत्रकार अझहर धनसे व मुजाहीद धनसे यांना अटक केले.. मात्र पांगळोली ग्राम पंचायती मध्ये लाखों चा भ्रष्टाचार करणारे अजून मोकाट कसे अशी उलट सुलट चर्चा सध्या म्हसळा तालुक्यात होताना दिसत आहे.
Comments
Post a Comment