मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे होणारे दुष्परिणाम लेखक - श्री. अण्णासाहेब संदिपान बिचुकले
लेखक - श्री. अण्णासाहेब संदिपान बिचुकले
रायगड जिल्हा परिषद शाळा खारगाव बुद्रुक, तालुका- म्हसळा, जिल्हा- रायगड
विसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या ज्या अनेक क्षेत्रात विकास झाला त्यात संपर्क क्षेत्राचा प्रामुख्याने समावेश होतो. रेडिओ, टेलिव्हिजन बरोबरच मोबाईल आणि इंटरनेटच्या आगमनाने या क्षेत्रात क्रांती झाली. माहितीची देवाण-घेवाण आणि उपलब्धता प्रचंड प्रमाणात वाढली. विशेषता इंटरनेटमुळे माहितीच्या निर्मिती आणि वितरणात वैयक्तिक सहभाग वाढला. यातूनच सामाजिक प्रसारमाध्यमांची *सोशल मीडिया* कल्पना साकार झाली. सुरुवातीच्या काळात इंटरनेट फक्त संगणक आणि लॅपटॉपशी संलग्न होते. त्यानंतर काळात ते मोबाईल मध्ये उपलब्ध झाले. जसे उपलब्ध झाले तसे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत काही तरुण तासंतास मोबाईल मध्ये घुसलेली आपल्याला पाहायला मिळतात. मोबाईल हे एक संवादाचे माध्यम म्हणून उत्तम आहे. परंतु मोबाईल अतिवापरणं किती धोकादायक आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे. सध्याच्या काळात मुलांना लहानापासून एक वेगळी सवय लागल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यांच्या हातात मोबाईल असल्याशिवाय ते जेवायलाच बसत नाहीत. कार्टून बघत, गाणी बघत किंवा गेम खेळत जेवण करण्याची ही सवय अतिघातक आहे. अर्थात ही सवय लागण्याला पालक सुद्धा तितकेच जबाबदार असतात. लहान असताना ते जेवत नाही हे पाहून पालक त्या ला मोबाईल दाखवून जेवण भरवायला सुरुवात करतात. मुलांना इथून पहिली मोबाईलची सवय लागते आणि मग पुढे पुढे जसं जसे ते मोठे होत जातात तशी ही सवय वाढते. मुलांना मोबाईल शिवाय दुसरं काहीच सुचत नाही. सतत 24 तास त्यांच्या हातात मोबाईल असतो. वेळीच पालकांनीही आवर न घातल्यामुळे मूल सुद्धा मग ऐकून घेत नाही आणि न्यायला जाणे पालकांना त्याचा हट्ट पुरवावा लागतो. पण ही सवय अतिशय वाईट आहे. एवढ्या लहान वयात मोबाईलचा अतिवापर हा अनेक आजारांचा विळखा घालण्यास कारणीभूत ठरू शकतो. जर मुलांना लहान वयातच मोबाईलची सवय लागली तर सगळ्यात पहिले ते शिकतात चॅटिंग करायला. पण यामुळे त्याला टीन टेंडोनाइटिस हा विकार होऊ शकतो. या विकाराला टीटीटी असेही म्हणतात. या चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने बोटे, हात, पाठ आणि मानेत खूप वेदना होऊ शकतात. याला वेळीच आवर न घातल्यास पुढे अजून गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. पूर्ण दिवस फोनचा वापर केल्याने आणि सोशल मीडियाच्या दुनियेत रमल्याने खऱ्या आयुष्यातले मित्र, खेळ दूर जाऊ लागली आहेत. त्यांना आपले मोबाईलचे जग जास्त आवडू लागले आहे. अनेक संशोधनातून हे दिसून आले आहे. मोबाईल जास्त वापरणाऱ्या मुलांमध्ये थकवा, ताण आणि तणाव मोठ्या प्रमाणावर जाणवत असतो. काही प्रकरणांत तर यातून मानसिक आजार निर्माण झाल्याचे सुद्धा दिसून आले आहे.
सतत फोनवर असल्याने झोपेचे भान राहत नाही. हळूहळू झोपेची वेळ सुटते आणि कधीही रात्री अपरात्री झोप येते आणि सकाळी झोप पूर्ण सुद्धा होत नाही. मुलांना याचा मोठा फटका बसू शकतो. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. हे अनेक अभ्यास पूर्ण संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे. मोबाईल फोन मधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन खूप काळ मोबाईलचा वापर केल्याने त्वचेतील उतीकांद्वारे शोषली जातात. लहान वयात या उतिका विकसित होत असतात, त्यात तितक्या सक्षम नसतात. त्यामुळे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा त्यांच्यावर मोठा परिणाम होऊन ब्रेन कॅन्सरचा धोका उद्भवतो. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आज माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारत हा जगाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण करत आहे. महासत्तेकडे जात आहे. परंतु सर्वात मोठी लोकसंख्या असलेले भारतात सर्वात मोठी तरुणाईची संख्या आहे. भारताला तरुणाईचा देश म्हणून ओळखले जाते. परंतु हीच तरुणाई आता मोबाईलच्या पाठीमागे धावू लागली आहे. आपल्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाचा आणि निर्णायक वेळ ती टाइमपास म्हणत असन तास मोबाईल मध्ये घालू लागली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलचा अतिरिक्त वापर करू लागली आहे. खरं म्हणजे मोबाईल हा माणसाच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. तो एक माणसाची गरज म्हणून पुढे आला आहे. संवादाचे माध्यम म्हणून मोबाईल हे अतिशय महत्त्वाचे काम करू लागला हे जरी खरे असले तरी मोबाईल मध्ये इंटरनेटने जसा प्रवेश केला तसा तो मोबाईल करमणूक म्हणून ओळखू लागला आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी त्याचे दुष्परिणाम ही होतात हे आपण विसरत चाललो आहे. दरम्यान सध्याचे युग हे सोशल मीडियाचं युग आहे आणि मुलं देखील यापासून दूर नाहीत. सोशल मीडियाचा जग जितकं मन रिफ्रेश करणार आहे तितकच ते चिंता वाढवणार आहे. माझ्या फोटोला लाईक येत नाही. मी अजून कसा फेमस होऊ शकतो? माझा मित्र जास्त फेमस आहे. तो माझ्याशी बोलत नाही, मी ती माझ्याशी बोलत नाही. अशा अनेक गोष्टी मुलांच्या चिंता वाढवायला कारणीभूत ठरू लागली आहेत. एवढेच नाही तर मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे माणसा माणसातील, घरातील आई-वडिलांमधील संवाद आता हरवत चालला आहे. प्रत्येक जण हा आप आपल्या मोबाईल मध्ये मग्न झाल्याचे चित्र बहुतांश घरात पाहायला मिळते. अशा या मोबाईलच्या आभाशी जगात वावरण्याची सवय लागल्यामुळे वास्तव जगाचा विसर पडत चाल ला आहे. आभाशी जगात रमतातना विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आणि प्रौढांना झोपेचा विसर पडलेला आहे. खरं म्हणजे इंटरनेट, मोबाईल मुळे मानवाची कार्यक्षमता वाढावी, त्याचे जीवन सुखी व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे, असे सांगितले जाते. मात्र, उपकरणाच्या अतिवापरामुळे माणूस अधिकाधिक उपकरणावलंबी आणि आळशी बनण्याची शक्यता लक्षात घेता मुलाच्या मोबाईल वापरावर मर्यादा आणणे हे आता आई-वडिलांचे कर्तव्य बनले आहे.
Comments
Post a Comment