श्रीवर्धन तालुका प्रशासनाकडून दरड प्रवण क्षेत्राची पाहणी
श्रीवर्धन तालुका प्रशासनाकडून दरड प्रवण क्षेत्राची पाहणी
श्रीवर्धन तालुका प्रशासनाकडून दरड प्रवण क्षेत्राची पाहणी
प्रतिनिधी राजू रिकामे
सद्यस्थितीत पावसाने सर्वत्र जोर पकडला आहे. अशाप्रसंगी श्रीवर्धन तालुका प्रशासनाने शहरातील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी केली आहे. धोंड गल्ली, रोहिदास नगर या ठिकाणी जाऊन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे, महसूल नायब तहसीलदार विपुल ढुमे , मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे . सबंध रायगड जिल्ह्यात विविध तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीचे गंभीर्य लक्षात घेऊन श्रीवर्धन तालुका प्रशासनाने नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. तसेच कोणत्याही स्वरूपाची आपत्ती निर्माण झाल्यास तात्काळ आपत्ती कक्षाशी संवाद संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. शहरातील धोंड गल्ली हे अतिशय उंचावर वसलेली वस्ती आहे. तसेच रोहिदास नगर मध्ये संरक्षक बंधाऱ्याच्या भिंतीला तडे गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने संबंधित जागेची पाहणी केली आहे. स्थानिक माजी नगरसेवक प्रीतम श्रीवर्धनकर व इतर नागरिकांनी संरक्षक बंधाऱ्याच्या भिंतीला तडे गेल्याची माहिती प्रशासनाला कळवलेली होती.
रोहिदास नगर हे दाट लोकवस्ती असलेले ठिकाण आहे. श्रीवर्धन तालुका प्रशासनाने आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दरड प्रवण क्षेत्रातील लोकांशी संवाद साधून त्यांना योग्य त्या सूचना दिलेले आहेत . तालुका प्रशासन आपत्ती प्रसंगी सज्ज आहे ....... महेंद्र वाकलेकर ( तहसीलदार श्रीवर्धन )
रोहिदास नगर मधील बंधाऱ्याच्या संरक्षक भिंतीला काही अंशी तडे गेले. त्या संदर्भात प्रशासनाशी संवाद साधला असून प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली आहे .... प्रीतम श्रीवर्धनकर ( माजी नगरसेवक )
Comments
Post a Comment