श्रीवर्धन तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर
श्रीवर्धन तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर
श्रीवर्धन प्रतिनिधी राजू रिकामे
जुलै महिन्यात सबंध रायगड मध्ये पावसाने जोर पकडला आहे . जुलै महिना भात शेतीसाठी पूरक ठरत आहे. अशा प्रसंगी महसूल प्रशासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी उपक्रम सर्वत्र जोरात राबवला जात आहे . श्रीवर्धन तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी तालुक्यातील प्रगत शेतकरी इफ्तिकार चरफरे यांच्या शेतात बांधावर जाऊन ई पीक पाहणी केलेली आहे . सदरच्या उपक्रम प्रसंगी महसूल नायब तहसीलदार विपुल ढुमे , मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर , तलाठी सुदर्शन पालवे , यांच्या समवेत ई पीक पाहणी प्रसंगी उपस्थित होते . सन 2023 मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप द्वारे ई पीक पाहणी करण्यासंदर्भात तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे . श्रीवर्धन तालुक्यात जवळपास लहान व मोठे 72 गावे आहेत. सद्यस्थितीत तालुक्याची लोकसंख्या 85000 च्या जवळपास आहे. मोबाईल ॲप द्वारे ई पीक पाहणी केल्यास शेतकऱ्याचा वेळ वाचणार आहे . तसेच महसूल प्रशासनाला शेतसारा गोळा करणे सोपे जाणार आहे . आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे . यापूर्वी स्थानिक तलाठी प्रत्येक गावात जाऊन पीक पाहणी करत असे त्यामध्ये वेळ आणि श्रम दोन्हींचाही नुकसान होत असे. तसेच ई पीक पाहणी मुळे कामामध्ये पारदर्शकता आलेली आहे.
Comments
Post a Comment