माळी समाज श्रीवर्धन व अलिबाग शासकीय रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीवर्धन येथे रक्तदान शिबिर


माळी समाज श्रीवर्धन व अलिबाग शासकीय रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीवर्धन येथे रक्तदान शिबिर


श्रीवर्धन प्रतिनिधी राजू रिकामे

श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालय येथे माळी समाज श्रीवर्धन व अलिबाग शासकीय रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोरे मॅडम व डॉ. मधुकर ढवळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .


श्री संत सावता माळी हे माळी समाज यांचे दैवत असून त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक २४ रोजी अलिबाग शासकीय रक्त केंद्र यांच्यासह उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन यांच्या सहकार्याने माळी समाज श्रीवर्धन याने अतिशय उत्तम प्रकारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात १११ रक्तदात्यांनी आपलं रक्तदान करून "रक्तदान हे श्रेष्ठदान" आहे हे दाखवून दिले. 


शिबिरामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावातून हरिहरेश्वर, दिवेआगर तसेच श्रीवर्धन शहरातील प्रत्येक पाखाडी, आळी मधून बरेच असे रक्तदाते, माळी समाजातील तरुण-तरुणी तसेच व्यापारी मित्र मंडळ श्रीवर्धन यांनी शिबिरात उस्फूर्त भाग घेऊन रक्तदान केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.


या कार्यक्रमाचे आयोजन माळी समाज श्रीवर्धनचे अध्यक्ष आनंत लक्ष्मण गुरव, सचिव दिलीप भुसाणे (काका), सहसचिव जयेंद्र कोसबे, उपाध्यक्षा प्रविता माने मॅडम, उपाध्यक्ष गजानन कोसबे, कोषाध्यक्ष प्रशांत सावंत, सह कोषाअध्यक्ष अनिल काशिनाथ वाणी सर,संपर्क म्हणून देवेंद्र चोगले, सुयोग चोगले, विजय भगत, क्षमा पोरनाक, किर्ती गुरव व काशिनाथ गुरव यांनी रक्तदात्यांना संपर्क करून रक्तदान करण्यास उत्स्फूर्त केले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर